कृष्णा आणि इबान मागच्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. पण त्यांनी त्यांचं नातं कधीच लपवलं नाही. तर टायगर आणि इबान एकमेकांना मागच्या 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात मात्र त्याला बराच काळ हे माहित नव्हतं की टायगरला एक बहीण सुद्धा आहे.
काही दिवसांपूर्वी कृष्णा आणि इबान यांनी लग्न केलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. मात्र याविषयी कृष्णाला विचारल्यावर ती म्हणाली, हे खरंच खूप गंमतीशीर आहे. अनेक आर्टिकल्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की मी आणि इबाननं गुपचूप लग्न केलं आहे. पण मला स्वतःला हे माझ्या आईकडून समजलं होतं.
कृष्णाला जेव्हा त्यांच्या रिलेशनशिपबद्दल घरी समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती असं विचारण्यात आलं त्यावर ती म्हणाली, ते माझ्या पर्सनल लाइफमध्ये प्रमाणापेक्षा जास्त लक्ष घालत नाहीत. त्यांना माझ्या निर्णयावर विश्वास आहे. घरातील सर्वजण यात माझ्यासोबत आहेत पण मला या नात्यासाठी काही वेळ द्यायचा आहे आणि सध्या तरी हे नातं आमच्यात ठेवायचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Tiger Shroff