मुंबई, 25 मे: माझ्या नवऱ्याची बायको (Mazhya Navryachi Bayko) ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. त्यात वापरण्यात आलेली नागपूरी भाषा प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरली. त्यात नागपूरीचा भाषेचा तडका असलेली नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ज्याच नाव आहे ‘तुझेच मी गात आहे’ (Tujhech Mi Gee tGaat Aahe ) आहे. स्टार प्रवाहवर (Star Pravah) ही मालिका सुरू झाली असून यातही अस्सल नागपूरी भाषेचा तडका पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. फार कमी वेळेत मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असून मालिकेचा प्रेक्षकवर्गही वाढला आहे. मालिकेत छोट्या स्वराने तिच्या अभिनयाने आणि नागपूरी बोलीने सर्वांची मने जिंकली आहेत. तिने सादर केलेलं ‘उडून ये फुलपाखरा’ हे गाणं चांगलंच गाजत आहे. गाण्याला आणि मालिकेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी मालिकेतील काही पडद्यामागील किस्से आणि शुटींग सर्वांसोबत शेअर केला आहे. तुझेच मी गात आहे या मालिकेती उडून ये फुलपाखरा या गाण्याचा BTS व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. उडून ये फुलपाखरा हे गाण स्वरा आणि मल्हार यांच्यावर शुट करण्यात आलं आहे. तसेच मालिकेतील कलकारांचे अनुभव देखील शेअर करण्यात आले आहेत. हेही वाचा - ‘पडल्या विकेट संपली यंदाची IPL वारी..’ कुशल बद्रिकेची पोस्ट नेमकी कशाबद्दल?
मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने तब्बल 15 वर्षांनी टेलिव्हिजनमध्ये कमबॅक केलं आहे. उर्मिला मालिकेत वैदेही हे पात्र साकारत आहे. तर अभिनेता अभिजीत खांडकेकर मल्हार कामत हे पात्र साकारत आहे. मल्हार हा प्रसिद्ध गायक आहे. मालिकेतील सर्वांची लाडकी स्वरा म्हणजेच बालकलाकार अवनी तायवाडे हिने साकारली आहे. अवनीने फार कमी वेळात सर्वांची मने जिंकलीत. उडून ये फुलपाखरा गाण्याच्या शुटींगविषयी सांगताना अवनी म्हणाली, ‘आम्ही बलापूरमध्ये खूप उन्हात गाणं शुट केलं. गाणं खुप मस्त आहे आम्हाला फार मज्जा आली. फक्त उन्हाचा फार त्रास झाला. 45 डिग्री तापमानात गाण्याचं शुटींग केलं. मालिकेतील सगळी गाणी मला आवडतात. सगळी गाणी मला दिग्दर्शक शिकवतात तसं मी करते’. उडून ये फुलपाखरा या गाण्याला संगीतकार निलेश मोहरीर याने संगीत दिलं आहे. गाण्याविषयी सांगताना निलेश म्हणाला, ‘हे गाणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. संतोष यांनी हे गाणं फार उत्तमरित्या शुट केलं आहे’. तुझेच मी गात आहे ही मराठीतील पहिलीच म्युझिकल मालिका असून मालिकेत प्रेक्षकांना एकूण 50 वेगवेगळी गाणी णपाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत.