मुंबई, 25 मे - चला हवा येऊ द्या
’ (Chala Hawa Yeu Dya) च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके
(Kushal Badrike) . विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी त्याची ओळख सांगितली जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नुकतीच त्याने एक पोस्ट केली आहे, ज्यामुळं तो चर्चेत आला आहे. त्याची ही पोस्ट नेमकी कशाबद्दल आहे, क्रिकेटबद्दल की आणि कशाबद्दल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
कुशल लवकरच एक नवीन सिनेमात दिसणार आहे. या त्याच्या नवीन सिनेमाचं नाव भिरकीट
(Bhirkit) आहे. या सिनेमाचा ट्रेलर उद्या, 26 मे रोजी
( bhirkit marathi movie trailer ) भेटीला येत आहे. यासाठी कुशलनी इन्स्टावर एक पोस्ट केली आहे. त्याने म्हटलं आहे की, पडल्या विकेट संपली यंदाची IPL वारी.. भिरकीट च्या ट्रेलर ची सुस्साट सवारी..! घेऊन येतोय उद्या ट्रेलर! त्याच्या या पोस्टनंतर चाहते कुशलला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
'भिरकीट'
(Bhirkit) हा सिनेमा 17 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुप जगदाळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. धमाल विनोदी आणि कौटुंबिक नाते यांच्या सोबतच या सिनेमात प्रेक्षकांना जबरदस्त संगीत ऐकायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी सिनेमातील ‘लाईन दे मला’ हे गाणं रिलीज झालं आहे. 'भिरकीट' च्या टिझर आणि पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आता याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार याची उत्सुकता लागली आहे.
या सिनेमात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.तसेच कुशल सध्या चित्रपटांमध्येसुद्धा व्यग्र आहे. तो लवकरच 'जत्रा 2' मध्ये धम्माल करताना दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.