Home /News /entertainment /

सोनाली पाटीलच्या हाताला हे काय झालं.? विकास पाटील म्हणतो, लवकर बरं व्हा आणि मैदानात..

सोनाली पाटीलच्या हाताला हे काय झालं.? विकास पाटील म्हणतो, लवकर बरं व्हा आणि मैदानात..

सोनालीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सोनाली पाटीलच्या हाताला दुखापत झाली आहे.

  मुंबई, 4 जून- बिग बॉस मराठी (bigg boss marathi 3 ) फेम कोल्हापूर गर्ल सोनाली पाटील (sonali patil ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सोनाली नेहमीच तिच्या हटके स्टाईलनं आणि भन्नाट इन्स्टा रील्सनं चाहत्यांचे लक्षवेधून घेताना दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमतून नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहत असते. सोनालीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सोनाली पाटीलच्या हाताला दुखापत झाली आहे. होय सोनालीचा हाताला दुखापत झाल्याने तिला सध्या तरी हात गळ्यात घेऊन फिरावं लागत आहे. सोनालीच्या हाताला दुखापत झाल्याचा फोटो विकास पाटीलनं (vikas patil) शेअर केला आहे. त्याने सोनाली पाटीलचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, एक हात गळ्यात असला तरी ताकद तेवढीच आहे पोरीत…आत्ताही सगळ्यांना लोळवू शकते 😎😁😝लवकर बरं व्हा आणि मैदानात उतरा पाटील 💪💪..विकास पाटीलच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील सोनालीला लवकर बरी होण्याची व काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Vikas B Patil (@_vikas24_)

  सोनाली पाटील आणि विकास पाटील यांची मैत्री बिग बॉस मराठीच्या घरात जुळली. आजही घराबाहेर आल्यानंतर यांची मैत्री टिकून आहे. बिग बॉस मराठीच्या घऱात विशाल निकम, विकास पाटील, सोनाली पाटील आणि मीनल शाह यांच्यात मैत्रीपलीकडंही खास बॉन्डिग झालेले पाहायला मिळाल. आजही ही चार एकत्र फिरताना व भेटताना दिसतात. म्हणून तर आज सोनालीलं लागलेलं कळताच विकास तिची विचारपूस करण्यासाठी आला. सध्या त्यांच्या या मैत्रिची देखील कौतुक होताना दिसत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या