Home /News /entertainment /

Sai Tujha Lekaru: दगडूच्या स्वॅगचा पुन्हा एकदा कल्ला, Timepass3 चं पहिलं गाणं रिलीज

Sai Tujha Lekaru: दगडूच्या स्वॅगचा पुन्हा एकदा कल्ला, Timepass3 चं पहिलं गाणं रिलीज

टाइमपास 3 सिनेमाही धमाकेदार गाण्यांनी भरला आहे. साईबाबांवर असलेलं दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास ३' मध्येही पाहायला मिळणार आहे. 'साई तुझं लेकरू' हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

    मुंबई, 4 जुलै:  टाइमपास ( Timepass) आणि टाइमपास 2 ( Timepass 2) या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षर: वेड लावलं. सिनेमात जितकी धम्माल स्टारकास्ट होती तितकीच तगडी गाणीही होती. 'ही पोळी साजूक तुलातली' ते 'दगडू सावधन' पर्यंत सगळ्याचं गाण्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिले आहे. मग टाइमपास3मध्ये तरी त्याचं प्रेम कसं कमी होईल. टाइमपास 3 सिनेमाही धमाकेदार गाण्यांनी भरला आहे. साईबाबांवर असलेलं दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास ३' मध्येही पाहायला मिळणार आहे. 'साई तुझं लेकरू' ( Sai Tujh Lekaru Song)  हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. गाण्यात साईच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत.  साई तुझं लेकरू हे गाणं सोशलम मीडियावर चांगलचं व्हायरल झालं असून प्रेक्षकांनी गाण्याला तूफान प्रतिसाद दिला आहे.  आतापर्यंत गाण्याला चांगल्या हिट्स मिळाल्या आहेत. आधीच्या दोन सिनेमांप्रमाणे हाही सिनेमा प्रेक्षकांचं तूफान मनोरंजन करेल यात काही शंका नाही. साई माझं लेकरू या गाण्यातून ती झलक पाहायला मिळत आहे.  या गाण्यात भाऊ कदम म्हणजेच दगडूचे वडील साईबाबांसमोर आभार मानत, दगडू तुमचाच लेकरू असल्याचे सांगत आहेत. दगडूवर तुमची कृपा कायम अशीच राहूदे, असेही ते सांगत आहेत. हे गाणे भाऊ कदम, प्रथमेश परब, आरती वडगबाळकर, मनमीत पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.  हे गाणं पाहून टाइमपास सिनेमातील ही पोळी साजूक तुपातली गाण्याची आठवण होतं आहे. हेही वाचा - Sonalee Kulkarni: लंडनच्या टाऊन ब्रिजवर अप्सरांनी केलं सिनेमाचं कलरफुल प्रमोशन, पाहा Video साई माझं लेकरू या गाण्याला अमितराज आणि आदर्श शिंदे यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. तर हे गाणं क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलं आहे. तसंच अमितराजनं सिनेमाला म्युझिक दिलं आहे. सिनेमातील हे धम्माल गाण्याचं राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. टाइमपास आणि टाइमपास 2 प्रमाणेच 'टाइमपास ३'मधील गाणीही प्रेक्षकांच्या ओठांवर अशीच रुळतील अशी अपेक्षा आहे. रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास 3 मध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळेची खास एंट्री पाहायला मिळणार आहे. दगडूच्या आयुष्यात आलेली 'पालवी'  सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दगडू आणि पालवीची ही भन्नाट स्टोरी २९ जुलैला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Time pass marathi movie song, Time pass marathi movie video

    पुढील बातम्या