मुंबई, 30 ऑगस्ट : स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. सध्या या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. या मालिका प्रचंड लोकप्रिय आहेत. आता प्रेक्षकांना या वेगवेगळ्या मालिकांमधील आवडत्या कलाकारांना एकाच मंचावर पाहण्याची संधी मिळणार आहे. स्टार प्रवाहवर येत्या 10 सप्टेंबरपासून ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा भन्नाट कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहचा हा नवा कोरा कार्यक्रम म्हणजे अंताक्षरीचा भन्नाट प्रयोग म्हणता येईल.स्टार प्रवाहाच्या मालिकांमधील कलाकार या शो मध्ये सहभाग घेणार आहेत. आता या शो चा एक धमाल प्रोमो समोर आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शोच्या नवीन प्रोमोमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचे कलाकार सहभागी झाले आहेत. दोन्ही मालिकांचे नायक जयदीप आणि मल्हार हे दोघे काही इंट्रेस्टींग खेळ खेळताना दिसणार आहेत. या शोचा सूत्रसंचालक सोद्धरथ जाधव याने या दोघांनाही चक्क हिल्स घालून स्टाईलमध्ये चालण्याचं चॅलेंज दिलं आहे. ते चॅलेंज हे दोघे पूर्ण करताना दिसत आहे. जयदीप आणि मल्हार दोघेही हिल्स घालून कॅट वॉक करत आहेत. त्यांच्यासोबत असलेले इतर कलाकारही या शोचा मनसोक्त आनंद घेत मजा मस्ती करताना दिसत आहेत.
आपल्या आवडत्या नायकांना एकत्र एकाच मंचावर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा नुसता म्युझिकल कार्यक्रम नाही. तर, बरेच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती जमतीही या मंचावर उलगडणार आहेत. त्यामुळेच प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. हेही वाचा - Shilpa shetty : शिल्पा शेट्टीच्या घरी झाले बाप्पाचे आगमन; पाय फॅक्चर असतानाही उत्साहात नाही कमतरता अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. स्टार प्रवाह परिवारातल्या दोन मालिकांच्या टीममध्ये ही अनोखी सांगितिक लढत रंगली आहे. सिद्धार्थ जाधवची एनर्जी आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर ‘होऊ दे धिंगाणा’ हा कार्यक्रम नक्की पाहा. स्टार प्रवाहचा हा अनोखा आणि भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ 10 सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.