मुंबई, 30 ऑगस्ट : गणेश चतुर्थी उद्यावर येऊन ठेपलेली असताना सध्या सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी दणक्यात सुरु आहे. मंडप सजलेत, ढोल ताशे तयार आहेत फक्त बाप्पाची कमतरता आहे. बॉलिवूडचे कलाकारही बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त असलेले दिसत आहेत. काही जणांकडे आधीच बाप्पा घरी आणले जातात. हे कलाकार मोठ्या आनंदाने आणि थाटामाटात बाप्पाचे आपल्या घरी स्वागत करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडेसुद्धा बापाचे आगमन झाले आहे. मोठ्या उत्साहात तिने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी गणेश चतुर्थीच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. शिल्पा शेट्टी सध्या पायाच्या दुखापतीमुळे ट्रस्ट आहे. काही दिवसांपूर्वी ती व्हीलचेअरवर आढळली होती. आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र बाप्पाच्या आगमनासाठी या अभिनेत्रींच्या उत्साहात थोडीही कमतरता नाहीये. शिल्पाने व्हीलचेअरवर बसून तसेच वोकरचा आधार घेत बाप्पाचे स्वागत केले. तिचा हा उत्साह पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. तसेच त्यांनी ती लवकर बारी होण्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना देखील केली आहे.
शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या आगामी वेब सिरीज इंडियन पोलिस फोर्ससाठी एका सीक्वेन्सचे चित्रीकरण करत होती, ज्यामध्ये सहकलाकार सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय होते, तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाली. इंस्टाग्रामवर, तिने व्हीलचेअरवर बसलेले स्वतःचे फोटो शेअर केले होते. तिएन कॅप्शन मध्ये लिहिले होते कि, “ते म्हणाले, रोल कॅमेरा अॅक्शन - “ब्रेक अ लेग!” आणि मी ते पूर्णपणे मनावर घेतले.’’ हेही वाचा - shahid kapoor : शाहीद कपूर करणार दुसरं लग्न?; अभिनेत्याच्या इंस्टाग्राम पोस्टनं वेधलं लक्ष शिल्पा शेट्टी सध्या या दुखापतीमुळे ट्रस्ट असली तरी बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत तिने कुठेही कमतरता ठेवली नाही. तसेच दुखणं बाजूला ठेऊन अतिशय उत्साहात बाप्पाचे स्वागत केले. तिचा हा उत्साह पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. तसेच त्यांनी ती लवकर बरी होण्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना देखील केली आहे.