मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

त्या शूटनंतर मी 15 दिवस आजारी होते - 'अरुंधती' साकारणारी मधुराणी म्हणते, 'मी तिच्याइतकी स्ट्राँग नाही'

त्या शूटनंतर मी 15 दिवस आजारी होते - 'अरुंधती' साकारणारी मधुराणी म्हणते, 'मी तिच्याइतकी स्ट्राँग नाही'

EXCLUSIVE Interview:  'अरुंधती'ची वेदना इतकं दुःख देईल वाटलं नव्हतं, आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतली मधुराणी गोखले प्रभुलकर प्रत्यक्षात कशी आहे?

EXCLUSIVE Interview: 'अरुंधती'ची वेदना इतकं दुःख देईल वाटलं नव्हतं, आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतली मधुराणी गोखले प्रभुलकर प्रत्यक्षात कशी आहे?

EXCLUSIVE Interview: 'अरुंधती'ची वेदना इतकं दुःख देईल वाटलं नव्हतं, आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतली मधुराणी गोखले प्रभुलकर प्रत्यक्षात कशी आहे?

    सोनाली देशपांडे आधीचे सगळे रेकॉर्ड मोडत 'आई कुठे काय करते' या मालिकेने नंबर एकची जागा पटकावली.  अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी गोखले प्रभुलकर सध्या चांगलीच चर्चेत आहे.  मालिकेत तीन दिवस चालणारा घटस्फोट सीन खूपच गाजला.  त्याबद्दलच मधुराणी सांगू लागली, ' तुम्ही जेव्हा 11-12 तास सेटवर राहून काम करता,  तेव्हा त्या भूमिकेत,  कुटुंबातल्या नात्यात एकरूप होता.  पण तरीही अरुंधतीची वेदना इतकं दुःख देईल वाटलं नव्हतं.' सेटवर सगळेच इतकं जीव तोडून काम करतात म्हणून ते प्रेक्षकांना भिडतं, असंही ती सांगते. 'या तीन चार दिवसाच्या शूटनंतर मी 15 दिवस आजारी होते.  मंगळसूत्र काढून देण्याचं दृश्य तर खूपच वेदनादायक होतं.' असं अरुंधती सांगत होती. इथे फक्त ग्लिसरीन नव्हतं, तर त्यात सगळेच एकरूप झाले होते. ती पुढे म्हणते, अरुंधतीची वेदना स्त्री म्हणून मी समजू शकले आणि म्हणूनच उतरवू शकले. याचे श्रेय मधुराणी मालिकेचे लेखक,  दिग्दर्शक रविन्द्र करमरकर यांना देते.  ती पुढे सांगते की, घराबाहेर पडण्याचा सलग 18 मिनिटांचा सीन तीन दिवस सुरू होता.  दैनंदिन मालिकेत तुम्हाला एका भावनेतून बाहेर पडायला वेळ मिळत नाही.  याचा त्रास तिला झाला. या मालिकेत अनेक पुरोगामी विचार समोर आले.  गौरीला मूल होणार नाही, तरी तिचा होणारा स्वीकार हे दृश्य तर खूप गाजलं. मधुराणी यावर म्हणते, ' अगदी सुरुवातीला टीव्हीवर शांती, दामिनी अशा पुरोगामी स्त्रिया दाखवणार्‍या मालिका होत्याच. त्या लोकप्रियही होत्या.  आता पुरोगामी विचार रुजवण्याचे श्रेय आमच्या बुद्धिमान लेखिका ललिता वर्तक,  मुग्धा गोडबोले यांना जातं. शिवाय स्टार प्रवाहचा, निर्मात्याचा सपोर्ट असल्याशिवाय असले प्रयोग नाही होत. ' अरुंधती आणि मधुराणी यात किती साम्य आहे? यावर मधुराणी म्हणते , ' अरुंधतीमधली स्त्रीत्वाची ताकद, कठीण प्रसंगात उभं राहण्याची ताकद माझ्यातही आहे. मी तर म्हणते, ती प्रत्येक स्त्रीमध्ये असते. पण पूर्वीची अरुंधती साकारणे मला खूप आव्हानात्मक होते.  कारण मी तशी नाही.  स्वयंपाकघरात रमणारी नाही. मला एवढी मोठी मुलं नाहीत.  शिवाय माझं आणि नवऱ्याचं नातं मित्रत्वाचं आहे. ' पण आताची अरुंधती मधुराणीपेक्षा स्ट्राँग आहे. ती सगळ्यावर मात करत नवी वाट शोधणार आहे, असंही मधुराणी सांगते. मधुराणीचा पती प्रमोद प्रभुलकर स्वतः दिग्दर्शक आहे. मग तो तिला काही सल्ले देतो का? यावर मधुराणी म्हणते, ' मी मालिका स्वीकारली ते त्याच्यामुळेच.  कारण अगोदर मी नाही म्हणाले होते. मुलगी लहान होती. डेली सोप म्हणजे 22 दिवस शूटिंग.  शिवाय आम्ही आता पुण्यात राहतो. शूटिंग मुंबईत. पण मग तोच म्हणाला, अशाच भूमिकेची तू वाट पहात होतीस ना. माझ्यापेक्षा त्यालाच वाटायचं की मी चांगली अभिनेत्री आहे. आज त्याला माझ्या कामाचं कौतुक आहे. ' मधुराणी चांगली गायिका आहे. आता तिला तेवढा वेळ नसतो. पण शूटिंगचे काॅल टाइम उशिरा असेल तर ती रियाज करते. मालिकेआधी ती कवितेचं पान हा शो करत होतीच. ' आजही मला कविता वाचायला आवडतात. कधी अस्वस्थ असले तर कविताच वाचते.' Boycott ट्रेंड झाल्यानंतर राधिका आपटे पुन्हा झाली बोल्ड; म्हणाली, 'not Impressed' स्वातंत्र्य दिन सगळीकडे साजरा होतोय. स्वातंत्र्याच्या मधुराणीच्या कल्पना काय आहेत? ' घरातली स्त्री एक व्यक्ती आहे. नवरा मला अमुक करू देतोय, या मानसिकतेतून तिनं बाहेर यायला हवं. नवऱ्यानीही हे लक्षात घ्यायला हवं, ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. '  पुढे मधुराणी सांगते की स्त्री आर्थिक स्वतंत्र होते, तेव्हाच हे स्वातंत्र्य जाणवतं. हे प्रत्येकीने लक्षात ठेवायला हवं. आज एखादी स्त्री घर सांभाळत असेल, तर नवऱ्याकडून पैसे मागायला तिला ओशाळवाणं वाटता कामा नये. तिचा तो हक्कच आहे, याची जाणीव घरच्यांनी ठेवली पाहिजे. ‘मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न थांबवा’; उर्मिलाचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर मधुराणी अनेक वर्षानी टीव्हीवर आली. तेव्हा तिला थोडी धाकधुक होती. पण सर्वसामान्यांपासून ते कलाकार, राजकीय व्यक्ती सगळ्यांनीच कौतुक केलं. मधुराणी सांगते, ' प्रेक्षकांचे मेसेज येतात. ज्यांची आई लवकर गेलीय, ते म्हणतात मला तुमच्यात माझी आई दिसते, तेव्हा ते प्रोत्साहनात्मक वाटतं.' जाता जाता या मालिकेने तुला काय दिलं हे विचारल्यावर मधुराणी म्हणाली, ' मी अभिनेत्री म्हणून कुठे आहे ते कळलं. 10 वर्षाच्या गॅपनं मी आले. मला माझीच ओळख गवसली.' (लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
    First published:

    Tags: Marathi entertainment, Tv actress, Tv serial

    पुढील बातम्या