मुंबई, 19 डिसेंबर- स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नंबर वन आहेत. आता यामध्ये भर टाकण्यासाठी नवीन वर्षात हा मनोरंजनाचा डोस डबल होणार आहे. कारण आता 17 जानेवारीपासून स्टार प्रवाह एक नवी कोरी व हटके कथानक असलेली मालिका सुरू होत आहे.या मालिकेचा पहिला वहिला प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेचे नाव पिंकीचा विजय असो' आहे. नावाप्रमाणेच अतरंगी सतरंगी गुलजार नार 'पिंकी'ची धमाकेदार एंट्री...या प्रोमोमध्ये दाखवण्याता आलेली आहे.
वाचा-जयदीप -गौरीच्या सुखी संसरात मिठाचा खडा; या अभिनेत्रीची होणार एंट्री
बाकी मालिकेच्या स्टारकास्ट किंवा कथानकाविषयी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र प्रोमो पाहून तर वाटत आहे की ही मालिका देखील प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी ठरणार आहे. मालिकेत मुख्य भूमिकेच दिसणारी अभिनेत्री देखील नवीन चेहरा असल्याचे दिसत आहे. शरयू सोनवाणे ( Sharayu Sonawane) या नवख्या अभिनेत्रीचे नाव आहे. शरयूला डान्सची आवड आहे.
View this post on Instagram
स्टार प्रवाह प्रमाणे झी मराठी, सोनी मराठी तसेच कर्लस मराठी या वाहिनीवर देखील नवीन मालिका नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही आल्या देखील आहेत.
वाचा-अभिनेते मिलिंद गुणाजी झाले सासरे; मालवणच्या मंदिरात पार पडलं मुलाचं लग्न!
झी मराठीवरील किचन कल्लाकार या नवीन शोला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहेत. प्रत्येत वाहिनी मनोरंजनाच्या रेसमध्ये टिकण्यासाठी काहींना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी मालिकांना मोठा प्रेक्षक वर्ग आहे. याचाच फायदा या वाहिन्यांना होत आहे. आता काही मालिकेंचे विविध भाषेत रिमेक देखील केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.