मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जयदीप -गौरीच्या सुखी संसरात मिठाचा खडा; दोघात तिसरी म्हणत या अभिनेत्रीची होणार एंट्री

जयदीप -गौरीच्या सुखी संसरात मिठाचा खडा; दोघात तिसरी म्हणत या अभिनेत्रीची होणार एंट्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.जयदीप आणि गौरी यांच्या नात्यात जवळीक वाढू लागली असतानाच आता आणखी एक विघ्न त्यांच्या सुखी संसाराच्या आड येणार असल्याचे समोर आले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 डिसेंबर - स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच जयदीप आणि गौरी दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप आणि गौरीच्या लग्नानंतर एक ट्विस्ट आणला आहे. या मालिका पुन्हा चर्चेत आली आहे. जयदीप आणि गौरी यांच्या नात्यात जवळीक वाढू लागली असतानाच आता आणखी एक विघ्न त्यांच्या सुखी संसाराच्या आड येणार असल्याचे समोर आले आहे. जयदीपची बालपणीची मैत्रीण म्हणजेच मनु या (ashwini kasar) मालिकेत एंट्री घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनूची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार साकारणार आहे.

नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, मनू आणि आई जयदीपच्या घरी दाखल झाले आहेत आणि माईला त्या मनूची ओळख करून देत आहेत. नुकत्याच मालिकेच्या या प्रोमोत मनू ही जयदीपची बालपणीची मैत्रीण आहे आणि या दोघांनाही एकमेकांशिवाय करमायच नाही असं प्रोमोत पाहायला मिळतंय. त्यामुळे गौरी आणि जयदीपच्या नात्यात मनुमुळे आता फूट कशी पडणार हे दाखवले जाणार आहे. अश्विनी कासार हिच्या आईची भूमिका अभिनेत्री अंजली वळसांगकर यांनी निभावली आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

अश्विनी कासार हिने कलर्स मराठीवरील कमला या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. अश्विनीने साकारलेली कमला प्रसिद्धी मिळवताना दिसली होती. कट्टी बट्टी, मोलकरीण बाई, सावित्री ज्योती या मालिकेत ती महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली होती. सावित्री ज्योती मालिकेत तिने साकारलेली सावित्रीबाईंची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती.

वाचा-बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे

अश्विनी कासार हिने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण आणि त्यानंतर अश्विनीने वकिलीचे शिक्षण घेतले. आदर्श विद्यामंदिर शाळेत असताना तिने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी दर्शवला होता. पुढे कॉलेजमध्ये असताना विविध नाटकांमधून काम करता आले. कमला या मालिकेमुळे अश्विनीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials