जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Atul Khatri : ब्रम्हास्त्र सिनेमाचं नाव बदलून ब्रम्हास्त्र फाइल्स ठेवा; कॉमेडियन अतुल खत्रींचं मोठ वक्तव्य

Atul Khatri : ब्रम्हास्त्र सिनेमाचं नाव बदलून ब्रम्हास्त्र फाइल्स ठेवा; कॉमेडियन अतुल खत्रींचं मोठ वक्तव्य

Comedian Atul Khatri

Comedian Atul Khatri

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाला प्रदर्शनाआधीच दररोज नवनवीन वादाला तोंड द्यावे लागत आहे. सध्या बॉयकॉट ब्रह्मास्त्र खूप ट्रेंडिंग आहे. त्यात नव्या वादाची भर पडली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 सप्टेंबर : बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. तसेच चित्रपटाचे प्री बुकींगसुद्धा जोरदार होत आहे. पण या चित्रपटाला प्रदर्शनाआधीच दररोज नवनवीन वादाला तोंड द्यावे लागत आहे. सध्या बॉयकॉट ब्रह्मास्त्र खूप ट्रेंडिंग आहे. तसेच चित्रपटातील कलाकार रोज काही ना काही कारणामुळे ट्रॉल होत आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकार ब्रह्मास्त्राला पाठींबा देत आहेत. आता ब्रह्मास्त्र चित्रपटावर स्टँड अप कॉमेडीयन अतुल खत्री याने भाष्य केलं आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अतुल खत्री हे प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडीयन आहेत. तरुणांमध्ये ते बरेच लोकप्रिय आहेत.  त्यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. नुकतंच अतुल खत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूडच्या महत्वाच्या चित्रपटांवर भाष्य केले आहे. त्या ट्विटची आता जोरदार चर्चा होत आहे. अतुल यांनी बॉलिवूडचे महत्वाचा सिनेमा ‘द कश्मीर फाईल्स’ याच्यावर टीका करत ब्रह्मास्त्राला पाठींबा दर्शवला आहे.  त्यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की. “चित्रपटाचं नाव बदलून ब्रह्मास्त्र फाईल्स ठेवा, भक्तमंडळी तो चित्रपट पाहतील.”

जाहिरात

या ट्विटची चर्चा होत असतानाच ‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अतुल यांना प्रत्युत्तर दिले आहे.  अतुल खत्री यांच्या ट्वीटला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. अतुल खत्री यांचं ट्वीट शेअर करत ते म्हणाले की, “तुझं नावही बदलून अतुल संत्री कर, त्यानिमित्ताने तरी तुला काम मिळेल.” हेही वाचा - Shreyas Talpade Exclusive: ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अटलजी नव्हे तर ‘या’ भूमिकेची दिली होती ऑफर; श्रेयसने केला मोठा खुलासा या दोघांच्या ट्वीटवर लोकांच्याही भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. सोशल मीडियावर हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहेत. 9 सप्टेंबर रोजी ब्रह्मास्त्र चित्रपटगृहात झळकणार आहे. चित्रपटसृष्टीतल्या तज्ञांच्या मते हा चित्रपट पहिल्या दिवशी 25 कोटींची कमाई करू शकतो आणि या विकेंडला हा चित्रपट 75 कोटींचा व्यवसाय करू शकतो. 5 वेगवेगळ्या भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षक यासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या बजेट सिनेमांविषयी  नकारात्मक वातावरण निर्माण झाले असले तरी ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर त्याचा परिणाम होणार नाही कारण या सिनेमाचे प्रदर्शनाआधीच मोठ्या प्रमाणात त्यामुळे झाले आहे. पण सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कलाकार आणि निर्मात्यांचं नशीब पणाला लागलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बॉलिवूडच्या नावेला तारणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात