मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Jhalak Dikhla Ja: 20 वर्षानंतर माधुरीने 'डोला रे डोला'या आयकॉनिक गाण्यावर केला डान्स, पाहा VIDEO

Jhalak Dikhla Ja: 20 वर्षानंतर माधुरीने 'डोला रे डोला'या आयकॉनिक गाण्यावर केला डान्स, पाहा VIDEO

 सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. या शोचा हा दहावा सीझन आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक लोकप्रिय कलाकारांनी या शोमध्ये सहभाग नोंदवला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 24 सप्टेंबर: सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. या शोचा हा दहावा सीझन आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक लोकप्रिय कलाकारांनी या शोमध्ये सहभाग नोंदवला आहे. 'झलक दिखला जा'च्या या सीझनला करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही जज करत आहेत. तसेच मनीष पॉल हा शो होस्ट करत आहे. अशातच याशोच्या आगामी भागाचा प्रोमो समोर आहे.

'झलक दिखला जा 10'च्या आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमुळे माधुरी दीक्षितच्या 'डोला रे डोला' या आयकॉनिक गाण्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर आणि माधुरी दीक्षित 'डोला रे डोला'वर धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसत आहे. यावेळी रोहित शेट्टीनेही उपस्थिती लावलेली पहायला मिळाली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

स्टेजवर अमृताने तिच्या कोरिओग्राफरसोबत 'डोला रे डोला' गाणे सादर केले. तिचा हा परफॉर्मन्स पाहून माधुरीही स्वत:ला या गाण्यावर डान्स करण्यापासून रोखू शकली नाही. या दोघींचा डान्स पाहून  रोहित शेट्टी, नोरा फतेही आणि करण जोहर आश्चर्यचकित झाले. त्यांनी या परफॉर्मन्सचं तोंडभरुन कौतुक केलं

माधुरी दीक्षितने 'देवदास' चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनसोबत 'डोला रे डोला'वर डान्स केला होता. त्यांचे नृत्य आजही खूप लोकप्रिय आहे. या गाण्याला आजतागायत प्रचंड प्रेम मिळत आहे. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर खूप लोकप्रिय ठरला.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Dance video, Madhuri dixit