मुंबई, 7 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूतच्या (sushant shing rajput case)परिवाराला न्याय मिळूनच नये या हेतून मुंबई पोलिसांची (Mumbai police)भूमिका अबाधित राहावी यासाठीच रिया चक्रवर्तीने (rhea chakraborty) नव्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, असा दावा सुशांतच्या परिवाराने (sushant singh rajput family) केला आहे. त्यांच्या वतीने वकील विकास सिंह यांनी हा आरोप केला आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी CBI ने तपास करावा असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतरही मुंबई पोलीसांनी या केसवर या ना त्या प्रकारे काम करत राहावं, या हेतूनेच रियाने ही तक्रार केली असल्याचं विकास सिंह यांचं म्हणणं आहे.
So this is clear attempt to somehow keep the Mumbai Police alive in this matter so that they can do some mischief and ensure that the family of Sushant does not get justice in this matter: Vikas Singh, lawyer of the father of #SushantSinghRajput https://t.co/U6428BsiGG
— ANI (@ANI) September 7, 2020
रिया चक्रवर्तीने आज सुशांतची बहीण प्रियांका सिंह हिच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. बांद्रा पोलीस स्टेशनला रियाने ही तक्रार दाखल केली आहे. सुशांतला औषधांचं बोगस प्रीस्क्रिप्शन प्रियांकाने दिल्याचा रियाने आरोप केला आहे.
रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी या बातमीची पुष्टी देताना सांगितलं, सुशांत हा OPD चा रुग्ण असल्याचं सांगत प्रियांकाने डॉक्टरांचं खोटं प्रिस्क्रिप्शन आणल्याचा आरोप रियाने केला आहे. रिया चक्रवर्तीने यासंबंधी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला ड्रग्जच्या अँगलमुळे आता नवं वळण मिळालं आहे. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या भावाला- शोविक चक्रवर्ती याला NCB ने अटक केली आहे. याशिवाय सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडासुद्धा NCB च्या अटकेत आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर 14 जून रोजी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. दुपारी आणलेल्या सुशांतच्या मृतदेहाचे रात्रीपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले होते. अशात हा सवाल उपस्थित केला जात आहे की सुशांतचे शवविच्छेदन करण्यासाठी इतकी घाई का करण्यात आली. शवविच्छेदनानंतर सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आला होता. व्हिसेरा रिपोर्टचा तपास करणाऱ्या एम्सच्या मेडिकल टीमला या प्रकरणात काही गोष्टी खटकल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput