Home /News /entertainment /

SSR Case: सुशांतची हत्या की आत्महत्या? उद्या येणार व्हिसेरा रिपोर्ट, मोठा खुलासा होण्याची शक्यता

SSR Case: सुशांतची हत्या की आत्महत्या? उद्या येणार व्हिसेरा रिपोर्ट, मोठा खुलासा होण्याची शक्यता

सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) व्हिसेरा रिपोर्ट उद्या मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणात काही महत्त्वाचे पुरावे समोर येऊ शकतात.

    मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूचे गुढ लवकरच उलगडले जाण्याची शक्यता आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर या घटनेबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. आता अशी बातमी समोर येत आहे की, सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्टट उद्या मिळणार आहे. हा मेडिकल बोर्डाच्या बैठकीत सादर केला जाईल. फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम उद्या एम्सच्या डॉक्टरांना सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टचा तपशील देणार आहे. फॉरेन्सिक एक्सपर्टच्या टीमकडून मिळणारा व्हिसेरा रिपोर्ट पाहिल्यानंतर एम्सच्या डॉक्टरांचे एक पॅनेल याप्रकरणी अंतिम बैठक करेल. या बैठकीत सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टबरोबरच त्याच्या पोस्ट मार्टम अहवालाबाबत देखील चर्चा केली जाणार आहे. एम्सचे डॉक्टर सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम अहवाल देणार आहेत. विसरा रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा होईल की सुशांतने विष खाल्ले होते, आत्महत्या केली होती  की त्याला फासावर कुणीतरी लटकवले होते. (हे वाचा-'उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार', कंगना रणौतने उधळली मुक्ताफळं) सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला होता. अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्यावर देखील आरोप करण्यात येत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला या प्रकरणातील ड्रग कनेक्शनमध्ये एनसीबीने अटक केली आहे. (हे वाचा-'रिया को फसाओ असा ड्रामा सुरू', अभिनेत्रीसाठी बॉलिवूडकरांचे माध्यमांना खुले पत्र) सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करणारी सीबीआय टीम मुंबईहून दिल्लीला पोहोचली आहे. अशी  बातमी समोर येत आहे  की सुशांतच्या मृत्यूप्रकरणी 20 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये मेडिकल बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरिज (CFSL) आणि सीबीआयच्या एसआयटीद्वारा देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या अहवालासंदर्भात चर्चा होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या