Home /News /entertainment /

दीपिकाच्या चौकशीदरम्यान उपस्थित राहणार रणवीर सिंह? स्पेशल परवानगीसाठी NCBकडे केला अर्ज

दीपिकाच्या चौकशीदरम्यान उपस्थित राहणार रणवीर सिंह? स्पेशल परवानगीसाठी NCBकडे केला अर्ज

दीपिका पदुकोण ड्रग्ज घेत असल्यानेच डिप्रेशनमध्ये गेली होती, बॉलिवूडमध्ये 95 टक्के लोक ड्रग्ज घेतात असा खळबळजनक खुलासा अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेले ड्रग कनेक्शन संपूर्ण बॉलिवूडला विळखा घालू लागले आहे. यामध्ये काही मोठी नावं समोर येत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) या बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. ड्रग्ज प्रकरणी तपासात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे ड्रग्जसंबंधी चॅट सापडले. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणला NCB ने समन बजावला आहे. तिला 25 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. मात्र एएनआयच्या वृत्तानुसार दीपिकाने 26 सप्टेंबरला आपण चौकशीसाठी येऊ असं सांगितल्याची माहिती NCB दिली आहे. (हे वाचा-पुन्हा चर्चेत आली बिग बॉस फेम बंदगी कालरा, बोल्ड Photos सोशल मीडियावर व्हायरल) दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार असे वृत्त समोर येत आहे की, ड्रग्ज प्रकरणी होणाऱ्या दीपिकाच्या चौकशीदरम्यान त्याठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी दीपिकाचा पती अर्थात अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने एनसीबीकडे मागितली आहे. यासंदर्भात त्याने एनसीबीकडे अर्ज देखील दिला आहे. यामध्ये त्याने असे म्हटले आहे की, दीपिकाच्या चौकशीदरम्यान त्याने तिथे असणे आवश्यक आहे कारण तिला कधी कधी पॅनिक अॅटॅक येतात आणि भीती देखील वाटते. त्यामुळे त्याला दीपिकाबरोबर असण्याची परवानगी देण्यात यावी. त्याने असे देखील म्हटले आहे की, तो कायद्याशी बांधिल नागरिक आहे आणि त्याला माहित आहे तो दीपिकाच्या चौकशीदरम्यान तिथे उपस्थित नाही राहू शकत परंतू तरी देखील तो एनसीबीकडे विनंती करत आहे. दरम्यान रणवीरच्या अर्जाबाबत एनसबीकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दीपिका पदुकोण ड्रग्ज घेत असल्यानेच डिप्रेशनमध्ये गेली होती, बॉलिवूडमध्ये 95 टक्के लोक ड्रग्ज घेतात असा खळबळजनक खुलासा अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे. शर्लिन म्हणाली, मी ज्या पार्टीत होते तिथे अनेकजण कोकेन घेत होते. त्या सगळ्यांची नावे NCBला सांगायला मी तयार आहे. बॉलीवूडची कुठलीही पार्टी ही ड्रग्ज शिवाय होत नाही. जर सारा, दीपिका यांची चौकशी झाली तर खूप मोठी नावं समोर येतील असंही तिने सांगितलं.
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या