मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

SSR CASE INSIDE STORY : एका Instagram पोस्टमुळे सिद्धार्थ सापडला NCB च्या जाळ्यात!

SSR CASE INSIDE STORY : एका Instagram पोस्टमुळे सिद्धार्थ सापडला NCB च्या जाळ्यात!

सुशांत राजपूतने मागील वर्षी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सुशांत राजपूतने मागील वर्षी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सुशांत राजपूतने मागील वर्षी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 01 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) आत्महत्या प्रकरणाला अचानक नवीन वळण मिळाले आहे. सीबीआय आणि एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे. पण, बराच तपास केल्यानंतरही हाती काहीच लागले नाही. अचानक  त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani Arrested)  याला हैदराबादमधून अटक करण्यात आली, त्यामुळे या प्रकरणाची दिशाच बदली आहे.

सुशांत राजपूतने मागील वर्षी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आधी मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास केला. त्यानंतर राजकीय धुरळा उडाल्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने मुंबईत येऊन नव्याने तपास सुरू केला. आता वर्षभरानंतर सुशांतचा रूममेट सिद्धार्थाला अटक केली आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर डिलीट केले होते इंस्टा अकाऊंट

इंग्रजी दैनिक 'मिड डे' ने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीला ऑगस्ट 2020 मध्ये सिद्धार्थ पिठाणीबद्दल माहिती मिळाली होती. सिद्धार्थ हा सुशांतच्या अंतसंस्काराच्या वेळी हजर होता. एका सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्यामुळे सिद्धार्थ एनसीबीच्या रडारवर आला होता. सुशांतच्या निधनानंतर त्याने आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करून टाकले होते. आता अलीकडेच त्याने नवीन अकाऊंट सुरू केले आहे.

ऑगस्ट महिन्यापासून सिद्धार्थ एनसीबीच्या ताब्यात सापडू नये म्हणून लपून राहत होता. नवीन अकाऊंटवर एप्रिल महिन्यात त्याने जिममधील काही फोटो शेअर केले होते. त्यासोबतच त्याने आपल्या साखरपुड्याचे फोटो सुद्धा पोस्ट केले होते.

Pune : टोमॅटोला व्हायरसची लागण, 'प्लास्टिक टोमॅटो' मुळं शेतकऱ्यांना लाखोंचा फटका

फोटो पोस्ट केल्यानंतर सिद्धार्थने आपल्या जिमला सुद्धा टॅग केले होते. त्यानंतर एनसीबीने जिमचा पत्ता शोधून काढला. सिद्धार्थला समन्स सुद्धा बजावण्यात आला होता, पण तो काही उत्तर द्यायला तयार नव्हता. त्यानंतर या पोस्टमुळे त्याचा ठिकाणा लागला, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं, असं वृत्त नवभारत टाईम्सने दिलं आहे.

सुशांतच्या घरातील नोकर नीरज आणि केशव यांचीही चौकशी केली जात आहे. सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी समाधान व्यक्त केले. पण, अद्याप सिद्धार्थ, नीरज आणि केशव यांच्या चौकशीत काय माहिती हाती लागली हे अद्याप वानखेडे यांनी सांगण्यास नकार दिला.

First published: