श्रीदेवींची 'लेक' अडकली लग्नाच्या बेडीत, पाहा ग्रँड वेडिंगचे UNSEEN फोटो

श्रीदेवींची 'लेक' अडकली लग्नाच्या बेडीत, पाहा ग्रँड वेडिंगचे UNSEEN फोटो

बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. तिच्या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. तिच्या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र ही श्रीदेंवीची रियल लाइफ मुलगी नाही तर त्यांची रील लाइफ मुलगी आहे. श्रीदेवी यांच्या ‘मॉम’ सिनेमात त्यांच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सजल अली हिनं तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड अहद रजा मीरशी आबू धाबीमध्ये लग्न केलं.

सजल अली आणि अहद रजा मीर यांनी मागच्या वर्षी जूनमध्ये साखपुडा उरकला होता. त्यानंतर आता नुकतंच त्यांनी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचा सोहळा 3 दिवसांचा होता. ज्यात त्यांच्या जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी हजेरी लावली होती.

Coronavirus चा धोका असूनही राधिका पोहोचली लंडनला, शेअर केला एअरपोर्टवरील अनुभव

‘मॉम’ या सिनेमात श्रीदेवींच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सजल अलीनं या सिनेमातून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली होती. हा सिनेमा हीट तर झालाच पण श्रीदेवींच्यासोबतच सजलच्या अभिनयाचंही खूप कौतुक केलं गेलं होतं.

Coronavirus मुळे 68 वर्षांपूर्वीचं प्रेमगीत झालं व्हायरल, VIDEO पाहिलात का?

सजलच्या मेहंदी सेरेमनीचं आयोजन अमीरात पॅलेस हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. याच हॉटेलमध्ये बाकीचे सर्व विधी पूर्ण करण्यात आल्या. सजलनं तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या खूप व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

❤️ PC @mahamiqbalbosan

A post shared by Sajal Ahad Mir (@sajalaly) on

 

View this post on Instagram

 

Hamari Mehndi 🌈 @ahadrazamir #Sajalahadmir #inabudabi @visitabudhabi @mahamiqbalbosan @mubsherbhatti

A post shared by Sajal Ahad Mir (@sajalaly) on

लग्नासाठी निवडलं आयर्लंड

लग्नाच्या मुख्य विधींसाठी सजल आणि अहद यांनी आबू धाबीच्या जवळच्या एका आयर्लंडची निवड केली होती. या आयर्लंडचं नाव होतं Zaya Nurai Island. हे एक प्रायव्हेट आयर्लंड रिसॉर्ट आहे. ज्याचं सौंदर्य आपण सजलच्या वेडिंग फोटोमध्ये पाहू शकतोच.

 

View this post on Instagram

 

Hello Mr. Mir ❤️ #InAbuDhabi

A post shared by Sajal Ahad Mir (@sajalaly) on

 

View this post on Instagram

 

Mehndi 🌹 #sajalahadmir #inabudhabi @visitabudhabi @mahamiqbalbosan

A post shared by Sajal Ahad Mir (@sajalaly) on

17 जानेवारी 1994 मध्ये पंजाबच्या लाहोरमध्ये जन्मलेल्या सजल अलीनं जिओ टीव्हीचा कॉमेडी शो नादानियांमधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र ती जास्तीत जास्त पाकिस्तानी मालिकांमध्ये दिसली. 2016 मध्ये तिनं पहिल्यांदा पाकिस्तानी सिनेमा ‘जिंदगी कितनी हसीन’मधून सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर 2017 मध्ये ती श्रीदेवींसोबत ‘मॉम’मध्ये दिसली.

लादेन सुद्धा होता अलका याग्निक यांचा फॅन, घरात सापडल्या होत्या गाण्यांच्या सीडी

First published: March 20, 2020, 11:59 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या