Coronavirus मुळे 68 वर्षांपूर्वीचं प्रेमगीत झालं व्हायरल, VIDEO पाहिलात का?

Coronavirus मुळे 68 वर्षांपूर्वीचं प्रेमगीत झालं व्हायरल, VIDEO पाहिलात का?

जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे. यातच एक 68 वर्षांपूर्वीचं प्रेमगीत व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : कोरोनामुळे सध्या जग चिंतेत पडलं आहे. या संसर्गजन्य रोगापासून वाचण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. त्यामध्ये दोघांमध्ये अंतर ठेवा, स्पर्श टाळा, हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोना संसर्गजन्य असून यामुळे खोकला, तापासह श्वास घेण्यासही त्रास होतो. अशा व्यक्तिच्या संपर्कात आल्यास तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो.

जगभरात भीतीचं वातावरण झालेल्या कोरोनावर सध्यातरी उपचार नाही. मात्र तोपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेसह प्रशासनाने दिलेल्या आदेशाचं पालन करणं गरजेचं आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गर्दीत जाणं टाळा. लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. यावरून एक जुनं प्रेमगीत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 1952 मध्ये आलेल्या साकी या चित्रपटातील हे गाणं आहे. प्रेमनाथ आणि मधुबाला यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यातील लहान क्लीप व्हायरल झाली आहे.

कोरोनापासून बचावासाठी खबरदारीचे जे उपाय सांगण्यात आले आहेत ते या गाण्यातून सहज समजत आहेत. या गाण्यातून जणू कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे सांगितलं आहे असंच वाटतं. हात अजिबात लावू नका कारण हातामुळे कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोरोना विषाणू लागलेल्या हातांनी तोंडाला स्पर्श केलात तर व्हायरस थेट शरीरात पोहोचेल. त्यामुळे जे काही आहे ते सर्व इशाऱ्यातूनच अंतर ठेवून करा ते आरोग्यासाठी चांगलं आहे.

असं आहे गाणं

दूर से दूर से जी दूर से हो दूर से

दूर दूर से हां जी दूर दूर से

पास नहीं आइए, हाथ ना लगाइए

कीजिए नज़ारा दूर दूर से

कीजिए इशारा दूर दूर से

व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या गीतकारानेही कधी विचार केला नसेल की इतक्या वर्षांनी अशा पद्धतीने अर्थ काढला जाईल. एखाद्या साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी गाण्याचा वापर होईल. ते काहीही असलं तरी हे गाणं मात्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

हे वाचा : आठवलेंच्या ‘कोरोना गो’ नंतर ढिंचॅक पूजा... नव्या गाण्याचा VIDEO होतोय व्हायरल

First published: March 20, 2020, 9:41 AM IST

ताज्या बातम्या