Coronavirus चा धोका असूनही राधिका आपटे पोहोचली लंडनला, शेअर केला एअरपोर्टवरील अनुभव

Coronavirus चा धोका असूनही राधिका आपटे पोहोचली लंडनला, शेअर केला एअरपोर्टवरील अनुभव

Coronavirus च्या धोकादायक परिस्थितीत राधिका आपटेला सुद्धा लंडनला जावं लागलं. तिथे पोहोचल्यावर या सर्व प्रवासाचा अनुभव तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त कोरोना व्हायरस बद्दल बोलल जात आहे. या व्हायरसनं जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे कोणाही याबाबत रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी बसले आहेत. अनेक हॉलिवूड कलाकारांना या व्हायरसचं संक्रमण झालं आहे. पण काही महत्त्वाच्या कामासाठी मात्र लोकांना घराबाहेर पडणं भाग आहे. अशा धोकादायक परिस्थितीत राधिका आपटेला सुद्धा लंडनला जावं लागलं. तिथे पोहोचल्यावर या सर्व प्रवासाचा अनुभव तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राधिका आपटे नेहमीच भारत ते लंडन असा प्रवास करत असते. पण कोरोना व्हायरसचा धोका असताना लंडनला जाणं खरं तर तिच्यासाठी जोखमीचं होतं. मात्र तरीही ती लंडना निघाली होती. ज्यामुळे तिचे कुटुंबीय खूप चिंतेत होते. त्यांमुळे तिथे पोहोचल्यावर आपली काळजी करणाऱ्या सर्वांनाच राधिकानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट करुन दिलासा दिला आणि यासोबतच या प्रवासाचा अनुभव शेअर केला.

संजय कपूरनं शेअर केले लेकीचे ग्लॅमरस Photo, पाहताना हटणार नाही नजर

राधिकानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, माझे मित्र, कुटुंबीय आणि माझ्यासोबत काम करणारे सर्व जे माझी काळजी करत आहेत. त्या सर्वांना मी सांगू इच्छितेकी, मी सुरक्षितपणे लंडनला पोहोचले आहे. इमिग्रेशनमध्ये मला कोणतीही समस्या आली नाही. सर्व रिकमी होतं त्यामुळे तिथल्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. हीथ्रो एक्सप्रेस पूर्णपणे रिमाकी होता. पॅडिंगटनमध्ये मोठ्या मुश्किलीनं कोणतरी दिसत होतं.

आठवलेंच्या ‘कोरोना गो’ नंतर ढिंचॅक पूजा... नव्या गाण्याचा VIDEO होतोय व्हायरल

राधिकानं तिच्या पोस्टमध्ये तिला मेसेज करून चौकशी करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. तिनं सांगितलं की, मी जेव्हा दोन दिवसांपूर्वी लंडनवरुन भारतात आले त्यावेळी फ्लाइट रिकामी होती. मात्र आता परत जाताना मात्र पूर्ण विमान भरलेलं होतं. राधिकानं सांगितलं की, इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडेही UK बॉर्डर बंद होण्याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

‘रात्रीस खेळ चाले’ची टॉप 5 मध्ये दणदणीत एंट्री, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर

First published: March 20, 2020, 9:45 AM IST

ताज्या बातम्या