मुंबई, 13 जुलै: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज क्रूझ प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल एक महिन्यांच्या तुरुंगवारीनंतर 2 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला. अनेक महिने सुरू असलेल्या या प्रकरणात काही महिन्यांपूर्वीच आर्यनला क्लिन चीट देण्यात आली. मात्र आर्यनला देशाबाहेर प्रवास करण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आली नव्हती. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. मात्र क्लिनचीट मिळाल्यानंतर आर्यनने स्पेशल NDPS कोर्टात पासपोर्ट परत करण्यासाठी आणि जामीन बॉन्ड रद्द करण्यासाठी याचिका सादर केली होती. ज्यावर कोर्टानं निर्णय दिला असून आर्यन खानला पासपोर्ट परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आर्यन खान आता खऱ्या अर्थानं सुटला असं म्हणायला हरकत नाही.
स्पेशल NDPS कोर्टाने कोर्ट रजिस्ट्रीला आर्यन खानचा पासपोर्ट त्याला परत करण्याचे आदेश दिले आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर कोर्टात आर्यन खानचा पासपोर्ट जमा करण्यात आला होता. कोर्टात आर्यन खाननं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटलं आहे की, एनसीबीने आर्यन खानचा पासपोर्ट त्याला परत करण्यासाठी कोणीही विरोध करू शकत नाही. एनसीबीनं आर्यन खानला क्लिनचीट दिली आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन विरोधात कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे आर्यन खानचा जामीन बॉन्ड रद्द करुन त्याचा पासपोर्ट त्याला परत केला जावा.
हेही वाचा - Riya Chakraborty: रिया चक्रवर्तीमुळे सुशांत झाला 'ड्रग अॅडिक्ट'; चार्जशीटमध्ये NCBचा गंभीर आरोप
एनसीबीने NDPS कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. या प्रकरणात आर्यन खान विरोधात कोणताही पुरावा सापडला नाही. एनसीबीनं आर्यन खानसह इतर 19 जणांना अटक केली होती. आर्यन खान या प्रकरणात सही सलामत सुटला असला तरी त्याच्याबरोबर अटक करण्यात आलेला अरबाज मर्जंट आणि मुनमुन धमेचा यांना कोर्टाकडून कोणतीही क्लिनचीट देण्यात आलेली नाही. दोघांनाही या प्रकरणात आरोपी घोषित करण्यात आलं आहे. एनसीबीनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केवळ 6 लोकांविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. मात्र उरलेल्या 14 लोकांवर केस सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Bollywood, Bollywood News, NCB