Home /News /entertainment /

VIDEO: ''झुंड' एक मास्टरपीस', मराठमोळ्या नागराज मंजुळेंचा चित्रपट पाहून सुपरस्टार धनुष भावुक

VIDEO: ''झुंड' एक मास्टरपीस', मराठमोळ्या नागराज मंजुळेंचा चित्रपट पाहून सुपरस्टार धनुष भावुक

'झुंड' चित्रपट पाहून साऊथ सुपरस्टार धनुष ( South Superstar Dhanush) भावुक झाला आहे. याआधी बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा भावुक झाला होता.

    मुंबई, 4 मार्च-   नागराज मंजुळे   (Nagraj Manjule)  दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan), आकाश ठोसर  (Akash Thosar), रिंकू राजगुरु   (Rinku Rajguru)  स्टारर 'झुंड'   (Jhund)  या चित्रपटाची सध्या तुफान चर्चा होत आहे. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन झालं होतं. त्यांनतर आज हा चित्रपट रिलीज झाला आहे. दरम्यान हा चित्रपट पाहून साऊथ सुपरस्टार धनुष   ( South Superstar Dhanush)  भावुक झाला आहे. याआधी बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा भावुक झाला होता. निर्मात्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांनतर आता धनुषचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. नुकतंच निर्मात्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'झुंड' चित्रपटावर सुपरस्टार धनुषची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. निर्मात्यांनी धनुषसाठी 'झुंड' ची खास स्क्रीनिंग ठेवली होती. चित्रपट पाहिल्यानंतर धनुषने आपली प्रतिक्रिया दिली आहे.धनुषने चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन आणि सर्व बालकलाकारांसह अनेक गोष्टींचे तोंडभरुन कौतुक केले आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला धनुष त्याच्या कारमधून खाली उतरताना दिसत आहे. पुढच्या सीनमध्ये तो चित्रपटाच्या टीमसोबत चित्रपटाचं स्क्रिनिंग करताना दिसत आहे. यानंतर तो म्हणतो की, चित्रपटाची सुरुवात मनाला आनंद देणारी आहे. या चित्रपटातील हजारो तांत्रिक गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. परंतु चित्रपटाचा शेवटचा भाग खूप भावुक करतो. (हे वाचा:Jhund पाहून आमिर खानने आकाश ठोसरला मारली कडकडून मिठी! म्हणाला...) धनुष पुढे म्हणतो, “हा चित्रपट एक मास्टरपीस आहे आणि तो खूप हिटदेखील होईल. चित्रपट पाहून मला प्रचंड आनंद झाला. बाल कलाकार आणि अभिनेत्यांची ही जादू आहे. चित्रपटाने माझं मन चोरलं आहे. मी नि:शब्द आहे. हा मनाला भिडणारा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन सरांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आहे. चित्रपटाच्या टीमसाठी मी आनंदी आहे."तसेच अभिनेता धनुषने हा चित्रपट बनवल्याबद्दल मराठमोळ्या नागराज मंजुळे यांचे आभार मानले आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Entertainment, Nagraj manjule, New release, South indian actor

    पुढील बातम्या