Home /News /entertainment /

Jhund पाहून आमिर खानने आकाश ठोसरला मारली कडकडून मिठी! म्हणाला.....

Jhund पाहून आमिर खानने आकाश ठोसरला मारली कडकडून मिठी! म्हणाला.....

'सैराट' या चित्रपटाने आकाश ठोसरला (Akash Thosar) एका रात्रीत सुपरस्टार बनवलं होतं.त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आकाश पुन्हा एकदा 'झुंड' (Jhund) या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

  मुंबई, 2 मार्च- 'सैराट' या चित्रपटाने आकाश ठोसरला   (Akash Thosar)  एका रात्रीत सुपरस्टार बनवलं होतं.त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आकाश पुन्हा एकदा 'झुंड'  (Jhund)  या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अमिताभ बच्चन आणि आकाश ठोसर असलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. इतकंच नव्हे तर आता बॉलिवूड   (Bollywood)  परफेक्शनिस्ट आमिर खानने   (Amir Khan)  आकाश ठोसरची स्तुती करत पाठ थोपटली आहे. अभिनेता आमिर खान आणि आकाश ठोसरचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेता आकाश ठोसरने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून आकाशचे चाहते फारच आनंदी झाले आहेत. सोबतच आकाशला शुभेच्छा देत त्याचं कौतुकदेखील करत आहेत. कारण आकाशने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत दिसून येत आहे. नुकतंच आमिर खानने 'झुंड' चित्रपटाच्या कलाकारांची भेट घेतली.
  View this post on Instagram

  A post shared by Akash Thosar (@akashthosar)

  आकाश ठोसरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आमिर खान 'झुंड' मधील कलाकारांची भेट घेताना दिसून येत आहे. ज्यावेळी आकाश ठोसर आमिर खानला भेटायला येतो, तेव्हा आमिर प्रचंड आनंदाने आकाशला मिठी मारतो. आणि त्याच्या भूमिकेचं तोंडभरुन कौतुक करतो. इतकंच नव्हे तर आमिर हसत-हसत आकाशला म्हणतो ही भूमिका मला दे. सोबतच आय लव्ह यु म्हणत आमिर आकाशवरील आपलं प्रेम व्यक्त करतो. त्यावेळी आकाशच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. आकाश ठोसरने हा व्हिडीओ शेअर करत आपल्या सर्वात भारी क्षणांपैकी एक क्षण असं म्हटलं आहे. (हे वाचा:Jhund' च्या टीममध्ये रंगला फुटबॉल सामना, आकाश ठोसरवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा ) नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन स्टारर 'झुंड' हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत अभिनेता आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे आणि अरबाज शेखसुद्धा आहे. तसेच या चित्रपटात रिंकू राजगुरूचीदेखील छोटीशी भूमिका पाहायला मिळणार आहे. सोशल मीडिया आणि इव्हेंटच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे.झुंड' हा फुटबॉलवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. जे गरीब मुलांसाठी फुटबॉल संघ तयार करतात. स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आणि घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. ज्यांनी फुटबॉलच्या माध्यमातून नागपूरच्या रस्त्यावरील मुलांना नवसंजीवनी दिली होती.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood actor, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या