जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Actress-Model Sahana dead : खळबळजनक! Birthday दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच केली हत्या?

Actress-Model Sahana dead : खळबळजनक! Birthday दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच केली हत्या?

Actress-Model Sahana dead : खळबळजनक! Birthday दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच केली हत्या?

अभिनेत्रीने 12 मे रोजी 21 वाढदिवस साजरा केला. त्यानंतर 13 मे रोजी रात्री 1 वाजता तिच्या कुटुंबाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

तिरुवनंतपुरम, 13 मे : 12 मे रोजी गुरुवारीच तिने आपला 21 वा बर्थडे साजरा केला. पण हा वाढदिवसच तिचा शेवटचा वाढदिवस असेल असं कुणालाच वाटलं नाही. वाढदिवसाला तिच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाच्या कानावर पडली.  वाढदिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्याचं तिच्या नवऱ्याने म्हटलं आहे. तर नवऱ्यानेच तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे (Kerala model Sahana found dead on her birthday). केरळमधील मॉडेल आणि अभिनेत्री सहानाचा मृतदेह सापडला आहे. 12 मे रोजी तिचा 21 वाढदिवस झाला. त्यानंतर 13 मे रोजी रात्री 1 वाजता तिच्या कुटुंबाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. तिचं कुटुंब कासारगोड जिल्ह्यात राहतं. तिच्या नवऱ्याने तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तर कुटुंबाने तिची हत्या झाली असून नवऱ्यानेच हत्या केली असा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिचा नवरा साजिदला आपल्या ताब्यात घेतलं आहे. हे वाचा -  Sohail Khan and Seema Khan Divorce : 2 बायकांसह सुखी संसार करणाऱ्या Salim Khan यांच्या दोन्ही मुलांवर का आली घटस्फोटाची वेळ? द न्यूज मिनिट च्या रिपोर्टनुसार सहानाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “माझ्या मुलीचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला नाही. तिची हत्या झाली आहे. तिचा छळ होत असल्याचं ती नेहमी आम्हाला सांगायची. तिचा नवरा दारू प्यायचा. त्याचे पालक आणि बहीणही तिला छळायचे. तिला वेगळ्या घरात राहायला सांगायचे. ते तिच्याकडून पैसैही मागत होते. वाढदिवशी तिला आम्हाला भेटण्याची इच्छा होती. पण तिचा नवरा तिला तिच्या कुटुंबाला  कधीच भेटू देत नव्हता किंवा आम्हाली घरी बोलवत नव्हता” हे वाचा -  24 वर्षांच्या संसारानंतर Sohail Khan ला Divorce; Malaika Aroroa नंतर खान कुटुंबापासून वेगळी होणारी Seema Khan आहे तरी कोण? सहानाने अनेक ज्वेलरीच्या जाहिरातीत काम केलं आहे. दीड वर्षांपूर्वी तिने साजिदशी लग्न केलं. तो आधी कतारमध्ये काम करत होता. त्यानंतर कोझिकोडेमध्ये सहानासोबत त्याच्या घरी राहू लागला. तिथं तिच्या नवऱ्यासह तिचे सासू-सासरे, नणंद तिचा छळ करत असल्याचं तिने आपल्या कुटुंबाला सांगितलं त्यानंतर तिच्या आईने त्यांना वेगळं राहण्याचा सल्ला दिला. काही आठवड्यांपूर्वीच ते दोघं कोझिकोडेत एका भाड्याच्या घरात राहत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात