जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कसा आहे नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा स्वभाव? VIDEO पाहा, समजेल सगळं काही

कसा आहे नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा स्वभाव? VIDEO पाहा, समजेल सगळं काही

रश्मिका मंदानाचा स्वभाव कसा आहे?

रश्मिका मंदानाचा स्वभाव कसा आहे?

एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून रश्मिका स्वभाव कसा आहे हे तुमच्या लक्षात येईल. पाहा व्हिडीओ

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 मे :  कलाकार हे स्क्रिनवर फार  मनमोकळे, चांगल्या स्वभावाचे वाटतात. कदाचित ते साकारत असलेल्या पात्रांमुळे आपल्याला असं वाटत असेल. पण हे कलाकार प्रत्यक्षात कसे आहे? त्यांचा स्वभाव कसा आहे? असे अनेक प्रश्न प्रत्येकाला कधी न कधी पडले असली. आपण आपल्या आवडत्या कलाकाराला भेटावं असं सर्वांना वाटत असतं.पण तो आपल्याशी कसा बोलेल ? कसा वागेल हे काही सांगता येत नाही. नॅशनल क्रश असलेल्या रश्मिका मंदानाच्या बाबतीत देखील असंच काहीस उडलं आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून रश्मिका स्वभाव कसा आहे हे तुमच्या लक्षात येईल. साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या लाइमलाइटमध्ये आहे. रश्मिका नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तिच्याबरोबर तिचे बॉडीगार्ड देखील होते. रश्मिका येताच चारही बाजूंनी तिच्या चाहत्यांनी घेरलं. रश्मिकाचे बॉडीगार्ड तिला मध्ये ठेवून प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच रश्मिकाच्या बॉडीगार्डनं एका व्यक्तीला जोरात धक्का दिला. बॉडीगार्डच्या या कृतीवर रश्मिकानं दिलेली प्रतिक्रिया कॅमेरात कैद झाली आहे. हेही वाचा -  3 हजाराचा ड्रेस, 11 हजाराचा मंडप, अमृता-अनमोलनं इतक्या कमी पैशात कसं केलं लग्न

जाहिरात

रश्मिकाच्या बॉडीगार्डनं एका व्यक्तीला धक्का दिल्याचं कॅमेरात कैद झालंय. पण त्या व्यक्तीला धक्का देताच रश्मिका मात्र बॉडीगार्ड थांबवते. असं करू नका असं सांगते. रश्मिकाचा हाच साधेपणा आणि चाहत्यांवरचं प्रेम या व्हिडीओमध्ये दिसलं आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिकाच्या बॉडीगार्डला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. पण नंतर रश्मिकानं केलेल्या कृतीचं कौतुक केलं आहे. रश्मिका स्वभावानं किती चांगली आहे. ती दुसऱ्यांचा किती विचार करतेय हे काही क्षणात पाहायला मिळालं, असं म्हणत अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हे देखील पाहायला मिळत आहे की, इतक्या गर्दीत एक महिला फॅन रश्मिकाच्या मागून धावत येते आणि तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी रिक्वेस्ट करते. रश्मिका देखील कोणताही संकोच न करता तिला हसत सेल्फी देते. यावर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी लिहिलंय, जर त्या अभिनेत्रीला सेल्फी देण्यासाठी कोणतीही अडचण नाहीये तर तिच्या बॉडीगार्डला काय अडचण आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी रश्मिकाच्या बॉडीगार्डवर चांगलाच राग काढला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात