मुंबई, 15 जून- नित्या मेनन हिनं प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नित्याला 3 फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अभिनयाव्यतिरिक्त गायन हे तिचं दुसरे टॅलेंट आहे. नित्यानं आतापर्यंत तेलगू, मल्याळम, तमिळ व हिंदी चित्रपटात काम केले आहे. नुकताच तिने पॉवर स्टार पवन कल्याण स्टारर ‘Bheemlanayak’ हा या तेलुगू चित्रपटात काम केलं आहे. सध्या नित्या एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. कास्टिंग काऊचबद्दल तिनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळं ती चर्चेत आली आहे. नित्यानं नुकतचं एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. नित्या म्हणाली की, टॉलिवूड इंडस्ट्रीत काम करताना मला कोणतीच अडचण आली नाही, इंथ चांगली वागणूक मिळते. पण तमिळमध्ये काम करताना माझ्यासोबत खूप घाणेरडा प्रकार घडला. वाचा- आज 10 कोटी मानधन घेणाऱ्या समांथाचा पहिला पगार ऐकून धक्का बसेल नित्या म्हणाली की, एका तमिळ चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान एका अभिनेत्यानं माझा खूप लैंगिक छळ केला. त्या अभिनेत्यानं मला खूप वाईट पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सध्या नित्याचं हे वक्तव्य खूप व्हायरल होत आहे. यामुळं अभिनेत्री चर्चेत आली आहे.
नित्या मेनन यांनी साऊथच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. साऊथव्यतिरिक्त तिनं अॅमेझॉन प्राइमच्या क्राइम थ्रिलर वेब सीरिज ‘ब्रीद: इनटू द शॅडो’मध्ये काम केले होते. यात नित्या अभिषेक बच्चनच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. नित्या मेननचा जन्म 8 एप्रिल 1988 रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला. ती लहानाती मोठी बेंगळुरू येथे झाले. तिचे शालेय शिक्षण तिच्या मूळ गावी असलेल्या स्थानिक शाळेत झाले. त्यानंतर तिनं मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन आणि बेंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर तिनं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून सिनेमॅटोग्राफीची पदवी मिळवली. नित्याला लहानपणी पत्रकार व्हायचं होतं. पण कालांतराने तिचा कल चित्रपटसृष्टीकडे झुकला. नित्याला अगदी लहान वयातच बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.