जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / निधनाच्या अफवांनी उडाली होती खळबळ; 15 दिवसातच अभिनेत्यानं घेतला अखेरचा श्वास

निधनाच्या अफवांनी उडाली होती खळबळ; 15 दिवसातच अभिनेत्यानं घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचं निधन

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचं निधन

अभिनेते सरथ बाबू यांची तब्येत काही महिन्यांपासून ढासळली होती. या कारणामुळे अभिनेत्याचं निधन झालं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  22 मे :  सिनेइंडस्ट्रीत अनेक कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. अशातच तमिळ आणि तेलुगू सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता सरथ बाबूचं निधन झालंय. ते 71 वर्षांचे होते.  काही दिवसांआधीच दिग्दर्शक, अभिनेता मनोबला यांचं देखील अचानक निधन झालं होतं. त्यांच्यानंतर आता सरथ बाबूच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा परसली आहे. सरथ बाबू यांनी रजनीकांतच्या ‘अन्नामलाई’ आणि ‘मुथु’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अभिनयाबरोबरत ते म्युझिक कम्पोजर देखील होते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्या निधनाची खोटी माहिती पसरवण्यात आली होती. अनेक मोठ्या लोकांनी त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली होती. त्यांच्या कुटुंबियांनी पुढे येऊन ही माहिती अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. तेव्हा त्यांच्या प्रकृती ठीक असून ते लवकरच बरे होतील असं देखील सांगण्यात आलं होतं. हेही वाचा - Anupam Kher: शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना दुखापत; पोस्ट शेअर करत दिली माहिती अभिनेते सरथ बाबू यांची तब्येत काही महिन्यांपासून ढासळली होती. त्यांना मागील महिन्यातही हैद्राबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हाही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं होतं. अनेक दिवस ते व्हेटिंलेटर होते. त्यांच्यावर मल्टी ऑर्गन डॅमेज झाल्यानं उपचार सुरू होते.   यावेळी पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी ते चेन्नाईमधील एका रुग्णालयात दाखल झाले होते.

News18लोकमत
News18लोकमत

अभिनेते सरथ बाबू यांनी 1973मध्ये तेलुगू सिनेमातून पदार्पण केलं. त्यानंतर कमल हसनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘निझाल निजामगिराधु’ सिनेमात त्यांनी काम केलं. तर बॉबी सिन्हा अभिनीत ‘वसंत मुलई’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. सरथ बाबूचा जन्म आंध्र प्रदेशच्या अमदलावलसा येथे झाला. ‘सत्यनारायण दीक्षित’ हे त्यांचं खरं नाव होते. सिनेसृष्टीत प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी सरथ बाबू असं नाव लावण्यास सुरूवात केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात