'या' लोकांना मोफत कोरोना लस देणार; प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली लसीकरणाची जबाबदारी

'या' लोकांना मोफत कोरोना लस देणार; प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली लसीकरणाची जबाबदारी

अभिनेता सोनू सूदप्रमाणेच (Sonu sood) अभिनेता चिरंजीवीनेही (chiranjeevi) कोरोना काळात गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : कोरोनाचा (Coronavirus) प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातून सुटका करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम (Corona vaccinetaion) राबविण्यात येत आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी या परिस्थितीमध्ये एकमेकांना मदत करण्याचं आवाहन देखील केलं होतं. यात सोनू सूद (sonu sood) सारख्या काही अभिनेत्यांनी सहभाग नोंदवला आहे. आत्ता यात दक्षिण सुपरस्टार चिरंजीवीचा (chiranjeevi) सुद्धा समावेश झाला आहे.

अभिनेता चिरंजीवीने कोरोना लसीकरणाची जबाबदारी उचलली आहे. काही लोकांना मोफत कोरोना लस (Free corona vaccine) उपलब्ध करून देण्याचा निर्णय चिरंजीवीने घेतला आहे. सध्या 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचं लसीकरण केलं जातं आहे. पण सरकारी कोरोना केंद्रात लस घेणाऱ्यांनाच ती मोफत मिळते आहे. खासगी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. पण चिरंजीवीने खासगी रुग्णालयातही लोकांना मोफत लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उचलली आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या कठीण काळामध्ये अनेक कलाकार नागरिकांच्या मदतीसाठी धावून येत आहेत. विविध मार्गांनी ते चाहत्यांना सहकार्य करत आहेत. दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवीसुद्धा यामधीलच एक आहे.

हे वाचा - फुलाला सुगंध मातीचा' मालिकेचं शूटिंग आता परराज्यात होणार?  )

गेल्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये चिरंजीवीने चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींसोबत एकत्र येऊन ‘कोरोना क्रायसेस चॅरिटी’ची स्थापना केली आहे. याअंतर्गत तामिळ चित्रपटसृष्टील श्रमिकांना आणि कर्मचाऱ्यांना मदत करण्यात येत होती. आता या लोकांनी अपोलो हेल्थ यांच्यासोबत मिळून सिनेवर्कर्स आणि पत्रकारांना मोफत कोरोना लस देणार असल्याची घोषणा केली आहे. इतकंच नव्हे तर इतर वैद्यकीय सेवासुद्धा अगदी कमी किमतीत पुरवल्या जाणार आहेत.

हे वाचा - खूपच सुंदर आहे ही MS धोनीची Ex-Girlfriend, लवकरच अडकणार विवाहबंधनात

या संघटनेकडून 45 वर्षांच्यावरील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. तसंच चिरंजीवीनं म्हटलं आहे, "हे लोक आपल्या कुटुंबाला सुद्धा घेऊन येऊ शकतात. मात्र त्यांना ही वयाची अट लागू होते.  हे लसीकरण 1 महिना चालणार आहे"

चिरंजीवीसोबतच प्रभास, रामचरण, ज्युनियर NTR, नागार्जुन यांसारखे कलाकारसुद्धा या कोरोनाच्या महासाथीमध्ये मदतीचा हात पुढे करत आहेत.

Published by: Aiman Desai
First published: April 21, 2021, 8:06 PM IST

ताज्या बातम्या