मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: श्रिया सरन बनली आई;अभिनेत्रीने एका वर्षापूर्वीच दिलाय बाळाला जन्म,आता केला खुलासा

VIDEO: श्रिया सरन बनली आई;अभिनेत्रीने एका वर्षापूर्वीच दिलाय बाळाला जन्म,आता केला खुलासा

श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.

श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.

श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 12 ऑक्टोबर- अभिनेत्री श्रिया सरनने(Shriya saran) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर (Share Video) करत आपण आई झाल्याचं सांगितलं आहे. हो तुम्ही नीट ऐकलात अभिनेत्री श्रिया सरन एक वर्षांपूर्वीच आई बनली आहे. मात्र तिने आता या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यामुळे चाहत्यांना एक सुखद धक्का बसला आहे.

श्रिया सरनने आपल्या या गोष्टीचा खुलासा नुकताच सोशल मीडियावर केला आहे. अभिनेत्रीने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच एक पोस्टही लिहिली आहे. श्रिया सरन गेली अनेक दिवस राजामौलीच्या RRR या चित्रपटामुळे चर्चेत होती. मात्र अभिनेत्रीने आपण एक वर्षांपूर्वीच आई बनल्याचा खुलासा करत सर्वानांच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अभिनेत्रीने पसोट लिहीत सांगितलं आहे, 'जेव्हा देश कोरोना महामारीशी लढा देत होता. तेव्हाच माझं आयुष्य बदललं होतं. याचदरम्यान मी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आमचं आयुष्यचं बदलून गेलं. आमच्या आयुष्यात उत्सुकता, जबाबदारी, थ्रिल या सर्व गोष्टी एकदमच आल्या. या गोष्टीसाठी देवाला धन्यवाद म्हणू इच्छिते'.

(हे वाचा:सलमान खानने बहिण अर्पिता खानच्या लग्नात गिफ्ट केला होता हा आलिशान फ्लॅट)

आपणाला सांगू इच्छितो, लॉक डाऊन अभिनेत्री श्रिया सरन आणि पती आंद्रेई कोशेव बार्सलोनामध्ये अडकून पडले होते. अभिनेत्री नुकताच आपल्या पतीसोबत मुंबईमध्ये परतली आहे. शिवाय तिने मुंबईमध्ये आपल्यासाठी घरही शोधलं आहे. पिंकवीलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं म्हटलं आहे, आम्ही बर्सिलोनाहून नुकताच परतलो आहोत. माझे पती सुरूवातील इथेच होते जेव्हा लॉकडाऊन लागला. आधी १ आठवड्यासाठी हा लॉकडाऊन होता. त्यानंतर १ महिना आणि पाहता पाहता हा लॉकडाऊन १ वर्ष राहिला. मात्र मला आनंद आहे मला माझ्या पतीसोबत हा वेळ घालवता आला. मी १८ वर्षांची असल्यापासून कधीच २ महिन्यांपेक्षा जास्त या शहरात राहू शकले नाह. कारण मला चित्रपटांच्या शूटिंगसाठी सतत फिरावं लागतं'.

(हे वाचा:Lakme Fashion Week 2021: लॅक्मे फॅशन वीकमध्ये आपल्या पतीसोबत रॅम्पवर उतरली काजल)

श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. श्रियाने रजनीकांतसारख्या अभिनेत्यासोबत 'शिवाजी द बॉस' सारखे चित्रपट केले आहेत. शिवाय बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत 'दृश्यम' हा चित्रपट केला आहे. सध्याचं सांगायचं झालं तर, अभिनेत्री राम चरण (Ram Charan) आणि जूनियर एनटीआर (Jr NTR) सोबत ‘आरआरआर’ (RRR) मध्ये दिसून येणार आहे. तसेच ती कॉलीवुड फिल्म ‘Naragasooran’ मध्येही झळकणार आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्री ‘Gamanam’ च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनामुळे याची रिलीज डेट पॉस्टपोन करण्यात आली होती.

First published:

Tags: Entertainment, South actress