Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Sooryavanshi' आता OTT वर करणार धम्माल; रोहित शेट्टीचा चित्रपट नेटफ्लिक्सनं कोट्यावधीत केला खरेदी

'Sooryavanshi' आता OTT वर करणार धम्माल; रोहित शेट्टीचा चित्रपट नेटफ्लिक्सनं कोट्यावधीत केला खरेदी

Ranveer Singh

Ranveer Singh

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपटाला लोक खूप प्रेम देत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर धम्माल करणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 13 नोव्हेंबर-  अक्षय कुमार  (Akshay Kumar)  आणि कतरिना कैफच्या  (Katrina Kaif) 'सूर्यवंशी'  (Sooryavanshi) चित्रपटाला लोक खूप प्रेम देत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर धम्माल करणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला 8 दिवस पूर्ण झाले असून या 8 दिवसात चित्रपटाने 120 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 100 कोटी क्लबमध्ये चित्रपटाचा समावेश झाल्यानंतर निर्मात्यांनी आता चित्रपट ओटीटीकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केल्याचे वृत्त आहे.

'सूर्यवंशी'च्या ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्सशी तगडा करार केला आहे. रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट नेटफ्लिक्सने १०० कोटींना विकत घेतला आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा 'सूर्यवंशी' चित्रपट 4 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार असल्याची माहिती आहे. लवकरच निर्माते OTT रिलीजची घोषणा देखील करू शकतात.

कोरोनामुळे 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट गेल्या वर्षीपासून पुढे ढकलली जात होती. निर्माते चित्रपटगृहे उघडण्याची वाट पाहत होते. कोरोनाचा वेग कमी होताच सरकारने सिनेमागृहे उघडण्याचे आदेश दिले. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. 'सूर्यवंशी' हा कोराना महामारीनंतर OTT वर विकला जाणारा सर्वात महागडा चित्रपट आहे. तथापि, 11 डिसेंबरपासून 'सूर्यवंशी' OTT वर दाखवला जाऊ शकतो अशी बातमी आली होती.चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या चार आठवड्यांनंतरच हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होत आहे. हे देखील एक मोठे कारण आहे, की ओटीटी प्लॅटफॉर्मने मोठ्या रकमेत चित्रपट विकत घेतला आहे. कारण सहसा असा करार थिएटर रिलीज झाल्यानंतर आठ आठवड्यांसाठी केला जातो.

(हे वाचा:कतरिना कैफसोबत लग्नाच्या चर्चेदरम्यान, विकी कौशलनं केला आपल्या आवडत्या मुलीचा...)

अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आंतरराष्ट्रीय स्तरावर 66 देशांमध्ये 1300 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या देशांमध्ये उत्तर अमेरिका, यूएई, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन सारख्या इतर अनेक देशांचा समावेश आहे. हा एक विक्रम आहे. 'सूर्यवंशी' भारतात 4 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. यासाठी, निर्मात्यांनी देशातील तीन प्रमुख मल्टिप्लेक्स - पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिससह करारानंतर चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंग यांचाही मोठा कॅमिओ आहे. जे प्रेक्षकांना पूर्ण मनोरंजनाचा डोस देत आहे. अक्षय कुमार अजय आणि रणवीरसोबत अॅक्शन करताना दिसत आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment, Katrina kaif, Rohit Shetty