सलमान खानसाठी रोहित शेट्टीची माघार, आता 'या' दिवशी रिलीज होणार सूर्यवंशी

हे दोन्ही सिनेमा एकाच दिवशी रिलीज झाले असते तर दोन्ही सिनेमांचं खूप नुकसान झालं असतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 04:19 PM IST

सलमान खानसाठी रोहित शेट्टीची माघार, आता 'या' दिवशी रिलीज होणार सूर्यवंशी

मुंबई,12 जून : सलमान खानचा नुकताच ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला सिनेमा ‘भारत’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. मागच्या काही वर्षांमध्ये ईदच्या दिवशी रिलीज झालेले सलमानचे सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरले आहेत. भारत नंतर आता सलमान संजय लीला भन्साळींच्या ‘इन्शाअल्लाह’ची तयारी करत आहे. हा सिनेमा 2020मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. पण याच दिवशी अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा सुद्धा रिलीज होणार होता मात्र सलमानसाठी रोहित शेट्टीनं माघार घेत आपल्या सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. त्यामुळे दोन बिग बजेट सिनेमांची बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर आता टळली आहे.

VIDEO : मराठीतील आत्तापर्यंतचं सगळ्यात बोल्ड गाणं रिलीज

मोठ्या पडद्यावर दोन मोठ्या अभिनेत्याचे दोन बिग बजेट सिनेमा एकाच दिवशी रिलीज होणं दोघांसाठीही नुकसानकारक असतं. तसेच सलमान खान ईदचा खेळाडू असल्यानं रोहित शेट्टीनं तडजोड करत त्याच्या सिनेमाच्या रिलीजची तारीख बदलली आहे. रोहितच्या या निर्णयानंतर सलमाननं ट्विटरवर रोहितसोबतचा एक फोटो शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. सलमाननं लिहिलं, ‘रोहितला मी नेहमीच माझा लहान भाऊ मानलं आहे आणि आज त्यानं हे सिद्धही करून दाखवलं. आता सूर्यवंशी 27 मार्च 2020ला रिलीज होणार आहे.’

WORLD CUP सुरू असतानाही टीम इंडियानं पाहिला 'भारत'


Loading... 

View this post on Instagram
 

I always thought of him as my younger brother and today he proves it... @itsrohitshetty Sooryavanshi releasing on 27th March, 2020.


A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

याशिवाय निर्माता करण जोहरनं सुद्धा सलमान खान आणि रोहित शेट्टीचा फोटो शेअर करत त्याला, ‘अल्टीमेट खेळडू आणि ब्लॉकबास्टर दिग्दर्शक 27 मार्च 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खानला स्पेशल थँक्स आणि प्रेम’ असं कॅप्शन दिलं.

जोरजोरात हसत होती प्रियांका चोप्रा आणि अचानक माकडानं लगावली कानशीलात
‘इन्शाअल्लाह’ हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सलमान खान आणि संजय लीला भन्साळी तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत आणि या सिनेमामध्ये सलमान पहिल्यांदाच आलिया भटसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा एक अ‍ॅक्शन आणि कॉप ड्रामा आहे. या सिनेमामध्ये अक्षय पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हे दोन्ही सिनेमा एकाच दिवशी रिलीज झाले असते तर दोन्ही सिनेमांचं खूप नुकसान झालं असतं.


भर रस्त्यात चोरी, भामट्यानं केलेल्या चतुराईचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 04:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...