मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सोनू सूदच्या मुंबईतील घरी आयकर विभागाची टीम; सहा ठिकाणी केली पाहणी

सोनू सूदच्या मुंबईतील घरी आयकर विभागाची टीम; सहा ठिकाणी केली पाहणी

सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणी Income Tax विभागाच्या टीमकडून पाहणी करण्यात आली आहे.

सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणी Income Tax विभागाच्या टीमकडून पाहणी करण्यात आली आहे.

सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणी Income Tax विभागाच्या टीमकडून पाहणी करण्यात आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्‍ली, 15 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्या मुंबई (Mumbai) स्थित घरावर आयकर विभागाची टीन पोहोचल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाची टीमने सोनूच्या घराचा सर्वे केला आहे. आयटी विभाग मुंबईत अभिनेता सोनू सूदच्या 6 भागांमध्ये एक सर्वेक्षण अभियान सुरू आहे. (Income tax department team at Sonu Sood's house)

कोरोना महासाथीदरम्यान सोनू सूदने गरजूंना मोठी मदत केली आहे. माध्यमांसह सर्वसामान्यांनी सोनूच्या कामाचं मोठं कौतुक केलं आहे. कोरोना महासाथीदरम्यान घरी परतणाऱ्या मजुरांना सोनूने वाहनांची व्यवस्था करून दिला, तर अनेकांना आर्थिक साहाय्य केलं. (A team from the Income Tax Department visited Sonu Soods Mumbai home and Survey at six places)

मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घराचा आयकर विभागाकडून सर्वे करण्यात आलं. आयकर विभागची (Income Tax Department ) टीम सकाळी सोनू सूदच्या घरी गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी विभागाने सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणच सर्वे केला. मात्र कोणत्याही वस्तू वा कागदपत्र जप्त करण्यात आले नाहीत. आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 133एनुसार सुरू असलेल्या ‘सर्वे अभियानात’ आयकर अधिकारी केवळ व्यावसायिक भाग आणि त्याच्याशी संबंधित भागांची पाहणी करू शकतात.

हे ही वाचा-OMG! हे ६ चित्रपट नाकारले होते कपिल शर्माने; शाहरुखलाही दिला होता नकार

लॉकडाऊनमध्ये सोनूने खूप लोकांना मदत केली होती. त्यामुळे देशभरात सोनूची मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी तर त्याचं मंदिरदेखील बांधलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद राजकारणात येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

First published:

Tags: Income tax, Mumbai, Sonu Sood