मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मेहुणा अडकला अफगाणिस्तानात; तालिबान राजमुळे एका महिन्यात नाही झाला संपर्क

या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मेहुणा अडकला अफगाणिस्तानात; तालिबान राजमुळे एका महिन्यात नाही झाला संपर्क

मागील एका महिन्यापासून अफगाणिस्तानात असलेल्या कौशल अग्रवाल यांच्याशी त्यांच्या कुटुंबीयांचं बोलणं झालेलं नाही. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, जिवंत आहेत की नाही याविषयी काहीच माहिती मिळालेली नाही.

मागील एका महिन्यापासून अफगाणिस्तानात असलेल्या कौशल अग्रवाल यांच्याशी त्यांच्या कुटुंबीयांचं बोलणं झालेलं नाही. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, जिवंत आहेत की नाही याविषयी काहीच माहिती मिळालेली नाही.

मागील एका महिन्यापासून अफगाणिस्तानात असलेल्या कौशल अग्रवाल यांच्याशी त्यांच्या कुटुंबीयांचं बोलणं झालेलं नाही. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, जिवंत आहेत की नाही याविषयी काहीच माहिती मिळालेली नाही.

दिल्ली, 15 सप्टेंबर : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानात सत्ता काबिज केल्यापासून याचा फटका अफगाणिस्तानातील नागरिकांसह जगभरातील लोकांना बसला आहे. लोकांना अफगाणिस्तान (Afghanistan Crisis) सोडण्यासाठी मोठी जिवाची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आता याचा फटका अफगाणिस्तानात स्थायिक झालेल्या भारतीयांनाही बसला असून त्यांना भारतात आणण्यासाठी भारतीय सरकारने (Indian Govt) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता काही लोकांना भारतात आश्रय मिळाला तर अजून काहींना अफगाणिस्तानाबाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

त्यामुळे आता अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढणयासाठी लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पण आता यामुळे भारतातील TV अभिनेत्री नूपुर अलंकार (Nupur Alankar) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा मेव्हणा कौशल अग्रवाल हा तालिबानच्या राज्यात अडकला असून त्याचे कुटुंबीय आता चिंताग्रस्त झाले आहेत. मागील एका महिन्यापासून कौशल अग्रवाल यांच्याशी त्यांच्या कुटुंबीयांचं बोलणं झालेलं नाही. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, जिवंत आहेत की नाही याविषयी लोकांना भीती निर्माण झाली आहे.

अफगाणिस्तानात पुन्हा सुरु होतंय ‘ते’ बदनाम मंत्रालय, सामान्यांचं जगणं होणार कठीण

नुपूर अलंकार (Nupur Alankar) यांनी आजतकला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की माझी बहीण जिज्ञासाची तब्येत मागच्या काही काळापासून अधिक खराब झाली आहे. कारण त्यांचे त्यांचे पती कौशल अग्रवाल हे मागच्या महिन्यापासून आमच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नाही. आम्ही जेव्हा 19 ऑगस्टला त्यांच्याबरोबर शेवटचं बोलणं केलं होतं, तेव्हा ते आपला मोबाईल चार्जिंग करत आहेत, असं बोलले होते. परंतु त्यानंतर त्यांचा कुठलाही फोन झालेला नाही, किंवा आमचा संपर्क त्यांच्याबरोबर झालेला नाही.

रक्तपात! तालिबाननं पुन्हा मोडलं वचन, पंजशीरमध्ये 20 जणांची हत्या

त्यामुळे आम्ही फार चिंतेत आहोत. नूपुर या सातत्याने रेस्क्यू करून भारतात आणल्या जाणाऱ्या लोकांच्या लिस्ट बघत आहेत. परंतु अजूनही त्यांनी त्यात त्यांच्या मेहुण्याचे नाव बघितलेले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय तणावात आहेत. आम्ही सतत भारताच्या विदेश मंत्रालयाच्या संपर्कात असून आम्हाला लवकरच ते सापडतील अशी आशा आहे, असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.

First published:

Tags: Afghanistan, Air india, Modi government, Taliban, Tv actress