मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Covid -19 ची लागण झालेल्या अभिनेत्रीने रुग्णालयातून प्रसिद्ध केला VIDEO; शेअर केला ह्रदयस्पर्शी अनुभव

Covid -19 ची लागण झालेल्या अभिनेत्रीने रुग्णालयातून प्रसिद्ध केला VIDEO; शेअर केला ह्रदयस्पर्शी अनुभव

या अभिनेत्रीच्या अख्ख्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सर्वांना रुग्णालयात दाखल केले आहे.

या अभिनेत्रीच्या अख्ख्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सर्वांना रुग्णालयात दाखल केले आहे.

या अभिनेत्रीच्या अख्ख्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सर्वांना रुग्णालयात दाखल केले आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 7 जून : टीव्ही सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अभिनेत्री मोहिना कुमारी (मोहना सिंह) यांनी नुकतेच ती आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. यात मोहिना कुमारी हिचे पती सुयश, तिचे सासरे उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज आणि सासूदेखील कोविड – 19 पॉझिटिव्ह आहे.

लग्नानंतर टेलिव्हिजनच्या जगापासून दूर राहिलेल्या मोहिना कुमारीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. अभिनेत्रीचा कोरोना रिपोर्ट आला आहे तेव्हापासून तिला ऋषिकेशमधील रुग्णालयात तिच्या कुटुंबीयांसह दाखल केले आहे. अशा परिस्थितीत मोहिनाने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आपले हेल्थ अपडेट दिले आहे.

अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने तिच्या कोरोना प्रवासाविषयी सांगितले आहे. मोहिना म्हणाली, 'मी आता ठीक आहे, पण तरीही मी मानसिकरित्या आजारी आहे. या समस्येचा तुमच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. जसे माझ्या बाबतीत घडले. आज रुग्णालयातील सहावा दिवस आहे. पण तरीही बरं वाटत नाही. आपल्या शरीरात एक विषाणू आहे, ही जाणीव खूप भयंकर आहे.

View this post on Instagram

A post shared by Mohena Kumari Singh (@mohenakumari) on

ती पुढे म्हणाली, 'मला कोरोनाचा त्रास सुरू होण्यापूर्वीच पदार्थांची चव येणे बंद झालं होतं. जवळपास 6-7 दिवसांपासून अन्नाची चव येत नव्हती. पण आता मी पूर्वीपेक्षा चांगली आहे. आम्ही कोरोना पॉझिटिव्ह कधी झालो हे मला व माझ्या कुटुंबास ठाऊक नाही. याचा संसर्ग कसा व कधी झाला हे माहित नाही. मात्र सध्या आमची प्रकृती स्थिर आहे. यादरम्यान आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या  नकारात्मक बातम्यांकडे दुर्लक्ष करा व सकारात्मक राहा.

हे वाचा-जगभरात कोरोनाने घेतला लाखोंचा बळी; या 3 देशांमध्ये माजलाय हाहा:कार

First published:

Tags: TV serials