मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'फोन नंबर लक्षात आहे ना..'? बहिणीच्या पराभवानंतर सोनू सूदचं पहिलं ट्विट

'फोन नंबर लक्षात आहे ना..'? बहिणीच्या पराभवानंतर सोनू सूदचं पहिलं ट्विट

 बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता सोनू सूदची बहीण  (Sonu Sood Sister) आणि काँग्रेस उमेदवार मालविका   (Malvika)  यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. मोगा मतदारसंघातून त्यांना हार पत्करावी लागली होती.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 13 मार्च-  बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता सोनू सूदची बहीण  (Sonu Sood Sister) आणि काँग्रेस उमेदवार मालविका   (Malvika)  यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. मोगा मतदारसंघातून त्यांना हार पत्करावी लागली होती. आपच्या डॉक्टर अमनदीप कौर अरोरा  (Amandeep Kaur Arora)  आणि मालविका यांच्यात जबरदस्त लढत पाहायला मिळाली होती. मात्र 20 हजारांहून अधिक मतांनी अमनदीप यांनी सोनू सूदची बहीण मालविका यांचा निवडणूक रिंगणात पराभव करून विजयाचा झेंडा फडकावला. बहिणीच्या पराभवानंतर नुकतंच, सोनूने एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये अभिनेत्यानं लोकांना वचन दिलं आहे की तो आणि त्याची बहीण दोघेही आयुष्यभर लोकांच्या सेवेत आधीसारखेच तत्पर राहतील. अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तो सतत ट्विटद्वारे चाहत्यांना अपडेट करत असतो. अलीकडेच त्याने त्याची बहीण मालविकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याला एक कॅप्शनसुद्धा दिलं आहे. या कॅप्शनने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. सोनू सूदने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे- 'विरोधात किती आहेत, हे आवश्यक नाही, सोबत किती आहेत, हे महत्वाचं आहे. मदत करण्यासाठी, फक्त जिद्द आणि उत्साह आवश्यक आहे. जो काल होता, आज आहे आणि कायम तसाच राहील. फोन नंबर लक्षात आहे ना मित्रांनो. यासोबत अभिनेत्याने लिहिलंय, 'मी आणि मालविका दोघेही आयुष्यभर तुम्हा लोकांची सेवा करत राहू'. (हे वाचा:RRR च्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम, Jr NTR- रामचरणसोबत दिसली आलिया भट्ट ) अभिनेत्याचं हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. सोनू सूदच्या या ट्विटवर अनेक लोक कमेंट्स करून त्याचं कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिलं - 'सर तुम्ही नेहमी आमच्या हृदयात आहात'. एका यूजरने लिहिलं- 'काँग्रेस नाही, तुमच्या बहिणीने 'आप'मध्ये प्रवेश करायला हवा होता'. आणखी दुसर्‍याने लिहिलं - 'विजय आणि पराभव हे दोन पैलू आहेत, तुम्ही लोकांचं मन जिंकलं आहे'. सोनू सूदने कोरोना काळापासून लोकांची आहोरात्र सेवा केली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अनेक लोक त्याला देवदूत मानत आहे. असं असतानाही त्याच्या लोकप्रियतेचा फायदा त्याच्या बहिणीला निवडणुकीत झालेला दिसला नाही.
First published:

Tags: Congress, Elections, Entertainment, Punjab, Sonu Sood

पुढील बातम्या