Home /News /entertainment /

RRRच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम, Jr NTR- रामचरणसोबत स्टेप करताना दिसली आलिया भट्ट,पाहा टीजर

RRRच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम, Jr NTR- रामचरणसोबत स्टेप करताना दिसली आलिया भट्ट,पाहा टीजर

साऊथ दिग्दर्शक (South director) एसएस राजामौली (S.S.Rajamouli) यांचा बहुचर्चित चित्रपट RRR (Rise Roar Revolt) रिलीज होण्यासाठी आता फारच कमी अवधी शिल्लक आहे. प्रेक्षकही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी RRR चं नवं गाणं RRR सेलिब्रेशन अँथमचा प्रोमो रिलीज केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 13 मार्च-   साऊथ दिग्दर्शक   (South director)  एसएस राजामौली   (S.S.Rajamouli)   यांचा बहुचर्चित चित्रपट RRR (Rise Roar Revolt) रिलीज होण्यासाठी आता फारच कमी अवधी शिल्लक आहे. प्रेक्षकही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी RRR चं नवं गाणं RRR सेलिब्रेशन अँथमचा प्रोमो रिलीज केला आहे. जो आता सर्वत्र व्हायरल होत आहे. गाण्यात आलिया भट्ट दोन्ही साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत डान्स करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. हे RRR चं सेलिब्रेशन अँथम सॉन्ग आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट ज्युनियर एनटीआर आणि राम चरणसोबत धम्माल डान्स करताना दिसत आहे. गाण्यात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर वंदे मातरमचा झेंडा फडकवताना दिसत आहेत. दोघेही कुर्ता पायजमासारख्या पारंपारिक लुककमध्ये दिसत आहेत. तर दुसरीकडे, आलिया भट्ट गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात फारच सुंदर दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by RRR Movie (@rrrmovie)

  आलिया रामचरण आणि ज्यु. एनटीआरसोबत ढोल-ताशांच्या गजरात डान्स करत आहे. आलियाचा दमदार लुक खूप चर्चेत आहे. आलियाचा हा लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करून त्यांचे कौतुक केले आहे. निर्मात्यांनी गाण्याचा प्रोमो रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे - 'हा आहे RRR सेलिब्रेशन अँथमचा प्रोमो.' यासोबतच हे गाणं 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजता रिलीज होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. (हे वाचा:VIDEO: वरुण धवन बनला समंथाचा बॉडीगार्ड, पाहा अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं) या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि अजय देवगण यांसारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. RRR 25 मार्चला चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट राम चरणचे पात्र अल्लुरी सीताराम राज यांच्या पत्नी सीतेची भूमिका साकारत आहे. हा तिचा पहिला साऊथ चित्रपट आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Alia Bhatt, Entertainment, South indian actor, Upcoming movie

  पुढील बातम्या