मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sonu Nigam: सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणारा अटकेत; कोल्हापूरातून जप्त केले 70 लाख

Sonu Nigam: सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणारा अटकेत; कोल्हापूरातून जप्त केले 70 लाख

 सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी लाखोंची चोरी

सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी लाखोंची चोरी

Sonu Nigam Family Case: गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रेटींच्या घरीदेखील चोरीसारखे धक्कादायक प्रकार घडत आहेत. या प्रकरणाला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमचे वडीलदेखील बळी पडले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 25 मार्च- गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रेटींच्या घरीदेखील चोरीसारखे धक्कादायक प्रकार घडत आहेत. या प्रकरणाला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमचे वडीलदेखील बळी पडले होते. सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी लाखोंची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान अवघ्या दोनच दिवसांत मुंबई पोलिसांनी लाखोंच्या चोरीचं गूढ उलघडलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आगम कुमार निगम यांच्या ड्रायव्हरला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचे 70 लाख रुपयेदेखील जप्त केले आहेत.

22 मार्च रोजी सोनू निगमची बहीण निकिता निगमने आपल्या वडिलांच्या घरातून 72 लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी त्यांच्या माजी ड्रॉयव्हरवरच संशय व्यक्त केला होता. संशयाच्या आधारे पोलिसांनी ड्रॉयव्हरचा शोध सुरु केला आणि दोन दिवसांच्या शोधानंतर त्याला अटक केली आहे. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्या माहितीवरुन पोलिसांनी कोल्हापुरातून चोरीस गेलेला 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

(हे वाचा: Smita Patil: मुलाला मनभरुन प्रेमही करु शकल्या नव्हत्या स्मिता पाटील; असा झालेला 31 वर्षाच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मृत्यू)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हरला 8-9 महिन्यांपूर्वी आगम कुमार निगमने कामावर ठेवले होते. परंतु त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला काही दिवसांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकले होते.

याचा बदला घेण्यासाठी 22 मार्च रोजी संधी मिळताच त्याने आगमकुमार निगम यांच्या घरात चोरीसारखा धक्कादायक प्रकार केला होता. याप्रकरणी चालकासह आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

तत्पूर्वी या घटनेत आगम कुमार निगम यांनी आधीच ड्रॉयव्हरवर आपला संशय व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी तो याठिकाणी ड्रॉयव्हर म्हणून काम करत होता. त्यानेच आपल्या घराची डुप्लिकेट चावी घेऊन किचनमधून घरामध्ये प्रवेश करत चोरी केल्याचा संशय व्यक्त केला होता.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Singer, Sonu nigam