जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हा खूप स्वार्थी निर्णय...'; आई बनल्यानंतर सोनम कपूरची पहिली प्रतिक्रिया

'हा खूप स्वार्थी निर्णय...'; आई बनल्यानंतर सोनम कपूरची पहिली प्रतिक्रिया

Sonam kapoor

Sonam kapoor

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. नुकतंच सोनमने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या भावना शेअर केल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 ऑगस्ट: गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रेग्नेंसीमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीला अखेर पुत्रप्राप्ती झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनम कपूर आहे. सोनमनं शनिवारी पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या सोनमवर आणि तिच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोनम आणि आनंद अहुजा यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. नुकतंच सोनमने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या भावना शेअर केल्या आहेत. सोनमनं एका फॅशन मॅगझिनशी झालेल्या संवादात तिच्या निर्णयाबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘आता आमची प्रायोरिटी बदलेल. आता मुलं ही आमची जबाबदारी होतील. ही गोष्ट खरी आहे की, मुलं स्वतःच्या इच्छेनं या जगात येत नाहीत. आपण त्यांना स्वतःच्या इच्छेनं या जगात आणतो. त्यामुळे हा अत्यंत स्वार्थी निर्णय आहे. त्यामुळे आपण सगळेच हा स्वार्थी निर्णय घेत असतो’, असं सोनमनं म्हटलं. हेही वाचा -  दिवसातून फक्त एकदा जेवण, उच्चशिक्षणासाठी नव्हता पैसा; समंथा प्रभूचा थ्रोबॅक व्हिडीओ होतोय VIRAL आई बनल्यानंतर सोनमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं, ‘20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या मुलाचे स्वागत केले आहे. या सुंदर प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आपल्याला माहित आहे की आता आपले जीवन कायमचे पूर्णपणे बदलणार आहे. सोनम आणि आनंद.’ सध्या ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. या गुड न्युजमुळे तिचे चाहते तर खूप जास्त आनंदी झाले आहेत.

जाहिरात

दरम्यान, सोनमला मुलगा होणार की मुलगी? याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर सोनमला मुलगा झाला असून सगळीकडे आनंद पसरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात