मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दिवसातून फक्त एकदा जेवण, उच्चशिक्षणासाठी नव्हता पैसा; समंथा प्रभूचा थ्रोबॅक व्हिडीओ होतोय VIRAL

दिवसातून फक्त एकदा जेवण, उच्चशिक्षणासाठी नव्हता पैसा; समंथा प्रभूचा थ्रोबॅक व्हिडीओ होतोय VIRAL

 साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'द फॅमिली मॅन 2' मधील उत्कृष्ट अभिनयानंतर ती हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'द फॅमिली मॅन 2' मधील उत्कृष्ट अभिनयानंतर ती हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'द फॅमिली मॅन 2' मधील उत्कृष्ट अभिनयानंतर ती हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 21 ऑगस्ट-   साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'द फॅमिली मॅन 2' मधील उत्कृष्ट अभिनयानंतर ती हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सोबतच पुष्पा चित्रपटातील 'ओ अंटावा' या आयटम सॉन्गद्वारे ती जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. नुकतंच अभिनेत्री करण जोहरच्या कॉफी विथ करण 7 या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. शोदरम्यान समंथाने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते. दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये तिनं आपल्या शैक्षणिक आयुष्याबाबत खुलासा करत एका शाळेमध्ये प्रेरणादायक असा संवाद साधला होता.

समंथाचा हा व्हिडिओ 2017 मधील आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये 'रंगस्थलम' अभिनेत्रीने 2012 मध्ये 'ये माया चेसावे' मधून अभिनयसृष्टीत पदार्पण केल्याचं सांगितलं आहे. दरम्यान,अभिनेत्रीनं सांगितलं की, ती नोकरीच्या शोधात असताना दोन महिने दिवसातून एकाच वेळी जेवत असे. अभिनेत्रीच्या उच्च शिक्षणासाठी तिच्या पालकांकडे पैसे नसल्याचा खुलासाही तिने यावेळी केला. इतक्या अडचणी असूनही, अभिनेत्रीने 10वी आणि 12वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.

समंथा या व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, 'मी जेव्हा शिकत होते तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला सांगितलं होतं खूप अभ्यास कर आणि तू यापेक्षा चांगलं काहीतरी करुन दाखवशील. त्यानंतर मी खूप मेहनत करुन दहावी, बारावी आणि कॉलेजमध्येसुद्धा टॉप केलं. पण नंतर जेव्हा मला पुढे शिक्षण घ्यायचं होतं, तेव्हा माझ्या आई-वडिलांना ते परवडणारं नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे कोणतंच स्वप्न नव्हतं. भविष्य नव्हतं काहीच नव्हतं'. त्यामुळे मी काय करायचं हे कधी ठरवलं नव्हतं'.

" isDesktop="true" id="749569" >

(हे वाचा:Bollywood Throwback: चॅलेंज! ओळखा पाहू फोटोतील गोंडस मुलीला; आज बॉलिवूडवर करतेय राज्य )

अभिनेत्री पुढे विद्यार्थ्यांना संबोधित करत म्हणते, 'मला माहित आहे की, तुमचा विश्वास आहे की, तुम्ही तुमच्या पालकांना तुमच्याकडून अपेक्षित असलेल्या मार्गावर जाल. पण मी आज इथे तुम्हाला स्वप्न बघायला सांगायला आलेय. तुम्हाला जे हवं आहे ते स्वप्न पाहा कारण असं केला तरच तुम्ही ते साध्य कराल. तुम्ही अयशस्वी व्हाल, बहुतांश वेळी तो मार्ग कठीण होईल - पण तुम्ही टिकून राहाल. मी कमीत कमी दोन महिने दिवसातून एकच वेळा जेवण केलं. मी विचित्र नोकर्‍यासुद्धा केल्या आणि मी आज इथे आहे. आणि या सगळ्यातून मी जर हे साध्य करू शकत असें तर तुम्हीसुद्धा नक्कीच साध्य करु शकाल'.

First published:

Tags: Entertainment, South actress