जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / तैमुरची बहीण बोलते अजब भाषा! बापलेकीच्या संवादाचा हा CUTE VIDEO होतोय व्हायरल

तैमुरची बहीण बोलते अजब भाषा! बापलेकीच्या संवादाचा हा CUTE VIDEO होतोय व्हायरल

तैमुरची बहीण बोलते अजब भाषा! बापलेकीच्या संवादाचा हा CUTE VIDEO होतोय व्हायरल

तैमुर, रोहित शर्माची मुलली समायरा, झीवा धोनी यांसारख्या स्टार किड्सचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. यामध्ये आता आणखी एका मुलीचं नाव समोर येत आहे. कुणाल खेमू आणि सोहा अली खानची मुलगी इनाया खानचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खूप हिट ठरत आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 फेब्रुवारी : सोशल मीडियावर स्टार किड्सचा नेहमीच बोलबोला असतो. यामध्ये तैमुर, रोहित शर्माची मुलली समायरा, झीवा धोनी यांसारख्या स्टार किड्सचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. यामध्ये आता आणखी एका मुलीचं नाव समोर येत आहे. कुणाल खेमू आणि सोहा अली खानची मुलगी इनाया खानचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खूप हिट ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी तैमुरप्रमाणेच Cute असणाऱ्या त्याच्या बहिणीचा अर्थात इनायाचा Cute आवाजात गायत्रीमंत्र म्हणताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. इनायाचा आणखी एक व्हिडीओ सोहा अली खानने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये कुणाल खेमू मुलगी इनायासोबत एका अजब भाषेत बोलताना दिसतोय.

जाहिरात

ही भाषा खुद्द सोहा अली खानला सुद्धा कळेनाशी झाली आहे. हे बाप-लेक मात्र खुशाल त्यांच्या ‘भन्नाट’ भाषेमध्ये गप्पा मारताना दिसले. या व्हिडीओला ‘Fathers and daughters really do speak a language all of their own (this is just a snippet)’ असं कॅप्शन दिलं आहे. बाप-लेक स्वत:ची भाषा बोलतात, त्याचीच ही झलक आहे असं सोहा म्हणतेय.   सोहाच्या या पोस्टवर तिच्या आणि इनायाच्या हजारो चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. सर्वांनाच हा व्हिडीओ खूप निरागस वाटत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात