मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sonam Kapoor : लेकाच्या आठवणीत इमोशनल झाली सोनम; म्हणाली 'त्याला एकटं सोडून जाताना...'

Sonam Kapoor : लेकाच्या आठवणीत इमोशनल झाली सोनम; म्हणाली 'त्याला एकटं सोडून जाताना...'

सोनम कपूर

सोनम कपूर

सोनम कपूर मुलगा वायूला घरी सोडून कामावर परतली आहे. अशावेळी एकीकडे उत्साही असलेली सोनम दुसरीकडे दुःखी देखील आहे. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 04 डिसेंबर : बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आहुजा बॉलिवूडपासून दूर असली तरी आईपणाचा आनंद घेत आहे. . २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला आहे.  आता तिच्या मुलाला वायू आहुजाला जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच सोनम  ग्लॅमरच्या दुनियेत परतली आहे. मध्यंतरी तिने मेकअप करताना तिचा मुलगा वायुला स्तनपान करत आहे असा व्हिडीओ शेअर केला होता. म्हणजे कामासाठी तिने मुलाला दूर केले नव्हते. पण आता तिला मुलगा वायूला सोडून कामावर जाण्याची वेळ आली आहे. अशावेळी एकीकडे उत्साही असलेली सोनम दुसरीकडे दुःखी देखील आहे. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या.

सोनम कपूर आता पुन्हा रेड कार्पेटवर थिरकण्यासाठी सज्ज आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. नुकताच सोनमने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एका कारमध्ये बसलेली दिसली मात्र तिचा मुलगा वायु तिच्यासोबत दिसला नाही. यानंतर

व्हिडिओमध्ये सोनम म्हणाली, ''मी वायुला खूप मिस करणार आहे. एक दिवसासाठी का होईना पण त्याला असं सोडून जायला मी घाबरत आहे. तो माझ्या आई आणि बहिणीबरोबरआहे त्यामुळे मला काही टेन्शन नाही. मी खरोखर फक्त २० तासांसाठी जात आहे. मला लवकर काम आटपून परतायचं आहे.''

हेही वाचा - Manasi Naik : 'माझ्यावर विश्वास ठेवा...' मानसीने केलेल्या गंभीर आरोपानंतर पतीची 'ती' पोस्ट चर्चेत

वायूच्या जन्मानंतर सोनम कपूरची ही पहिली आंतरराष्ट्रीय प्रवास करत आहे. मुलाला एकटं टाकून जाताना तिच्या मनात थोडी धाकधूक होतीच. विमानतळावर जाताना तिने व्हिडीओ शेअर केला आहे. ती रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना दिसली आहे.

दरम्यान, सोनमचा एअरपोर्ट लूक चाहत्यांना खूप आवडला होता. तिने लांब क्रीम ट्रेंच कोटसह बेज रंगाचा पोशाख परिधान केला होता. कार्यक्रमासाठी जेद्दाहला जात असताना त्याने मोठ्या आकाराचे सनग्लासेस देखील घातले होते. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने तिच्या टीमचे कौतुक केले आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या सर्वोत्तम टीमसोबत.'

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनमने ऑफ स्लीव्हज असलेल्या लाल गाऊनमध्ये स्टायलिश एन्ट्री केली होती. तिने यासोबत चंकी डायमंड नेकलेसही घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. सोनम व्यतिरिक्त करीना कपूर, सैफ अली खान, शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या महोत्सवात हजेरी लावली.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Sonam Kapoor