मुंबई, 04 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईक खूप चर्चेत आहे. मानसी तिचा पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेणार असल्यामुळे सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळतेय. घटस्फोटाची चर्चा सगळीकडे पसरताच मानसीने स्वतः पोस्ट शेअर करत ती खरंच घटस्फोट घेणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला. तेव्हापासून मानसीची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल होताना पहायला मिळते. केवळ मानसीचीच नाही तर तिचा नवरा प्रदीप खरेराच्या पोस्ट देखील व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच प्रदीपने नवा व्हिडीओ शेअर केलाय पण त्याच्या कॅप्शनचीच चर्चा होत आहे. प्रदीप खरेरा हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रदीप हा इन्स्टाग्रामवर विविध स्टोरी शेअर करताना दिसत आहे. नुकतंच प्रदीपने इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो त्याची बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पण त्याने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रदीपने लिहिलंय कि, ‘‘मी प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा मी सर्व गोष्टींवर काळजीपूर्वक नजर ठेवतो.’’ त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हेही वाचा - Sharad Ponkshe : भाळी कुंकू, नाकात नथ अन् खांद्यावरून पदर; शरद पोंक्षेंच्या या लूकने वेधलं लक्ष कालच मानसीने सुद्धा असाच जिममध्ये व्यायाम करतानाच फोटो शेअर केला होता. आता त्यानंतर प्रदीपने केलेल्या या व्हिडिओची चर्चा होत आहे. दरम्यान मानसी आणि प्रदीप गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमांतून एकमेकांवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधत आहेत.
दरम्यान, मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यापूर्वी अनेक वर्ष मानसी आणि प्रदीप एकमेकांना डेट करत होते. दोघेही सतत सोशल मीडियावर सक्रिय असायचे. एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त करत असायते. मात्र अचानक दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मानसी आणि प्रदीपमध्ये अचानकपणे उडालेले खटके पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. अखेर दोघं लवकरच घटस्फोट घेणार आहेत.
त्याच दरम्यान मानसीने नवऱ्यावर गंभीर आरोप केले होते. प्रदीपवर गंभीर आरोप करत मानसी म्हणाली की, ‘‘काही लोक फक्त प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीशी नातं जोडतात. पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळतेय तोपर्यंत ते चांगले असतात, त्यांच्याकडून मिळेल तेवढं घेतातात. असंच काही तरी माझ्यासोबत झालं.‘‘आता मानसीच्या आयुष्यात आलेल्या या वादळाने ती खचून न जाता नव्या उत्साहात कामाला लागली आहे.