मुंबई, 30 डिसेंबर- बिग बॉस मराठी तीनचा (Bigg Boss Marathi) महाविजेता विशाल निकम (Vishal Nikam) झाला आहे. विजयी झाल्यानंतर त्याच्या गावकऱ्यांनी जंगी स्वागत करत मिरवणूक काढली. बिग बॉस मराठीच्या घरात**(BB Marathi Season 3 Winner)** विशाल निकमने एक शब्द दिला होता. तो शब्द विशाल निकमने पूर्ण केला आहे. विशाल निकम बिग बॉस मराठीच्या घरात सांगितले होते की, घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वात पहिली कुणाची भेट घेईल तर ती, कीर्तनकार शीवलीला पाटील हिची. आज त्यांना त्याचा शब्द पाळत शिवलीला पाटीलची पंढरपुरात भेट घेतली आहे. या भेटीचा व्हिडिओ शेअर करत त्याने म्हटले आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना आणि आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात….माऊलींच्या पंढरपुरात!ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी! वाचा- शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण ; पोस्ट शेअर करत दिली माहिती बिग बॉसच्या घरात शिवलीला पाटील हिला माऊली..माऊलू असं म्हणत असे. विशालचे आणि शिवलीलाचे घरात खास बॉन्डिंग झालं होते. शिवलीला तिच्या आजरपणामुळे घरात जाऊ लागले. यावेळी विशालला रडू कोसळले होते. मात्र आज या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यानं शिवलीलाची भेट घेतली आहे. चाहत्यांना देखील या दोघांना एकत्र पाहून आनंद झाला आहे. वाचा- शिल्पाच्या मुलाने मीडियासमोर मास्क काढण्यास दिला नकार, मग झालं असं.. विशाल निकम हा मराठी मालिकांमधील अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु बिग बॉस मराठीने त्याला एक विशेष ओळख निर्माण करून दिली आहे.बिग बॉसने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं आहे. त्याचा साधा-सरळ स्वभाव प्रेक्षकांना फारच भावून गेला. हा अभिनेता खऱ्या आयुष्यातसुद्धा तितकाच साधा आणि सिम्पल आहे. त्यामुळेच तो या रिऍलिटी शोमध्येसुद्धा तसेच पाहायला मिळाला.
विशाल निकमचा जन्म 10 फेब्रुवारीला देवखिंडी या गावात झाला होता. हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. या गावात विशालचे हे सुंदर घर आहे. त्याचे आईवडील वडिलांच्या कामानिमित्त परराज्यात असतात. तर तो आपल्या कामानिमित्त मुंबईमध्ये असतो. विशालच शिक्षण सांगलीत पूर्ण झालं होतं. तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुण्याला गेला होता. त्याने जोतिबा, साता जल्माच्या गाठी अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु त्याला खरी ओळख बिग बॉस मराठीने मिळवून दिली आहे. बिग बॉस मराठीमुळे विशालला प्रचंड लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. याचीच पोचपावती म्हणून आज त्याने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.