मुंबई, 20 मार्च : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरून कनिकाला अटक करावी अशी मागणी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कनिकानं तिला कोरोना झाल्याची माहिती सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर तिनं एक पार्टी सुद्धा अटेंड केली. त्यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा आरोप कनिकावर केला जात आहे. अशात आता लंडन कनिका कोणाला भेटण्यासाठी गेली होती याची माहिती समोर आली आहे.
न्यूज चॅनेल आज तकला दिलेल्या मुलाखतीत कनिकानं सांगितलं की, मी आता 14 दिवस कोणालाही भेटू शकत नाही. मी जेव्हा लंडनवरुन परतले त्यावेळी मी पूर्णपणे ठिक होते. पण मागच्या 4 दिवसांपासून मला सामान्य तापाची लक्षणं दिसून आल्यानं मी माझी टेस्ट करून घेतली असता ती कोरोना पॉझिटीव्ह आली. या मुलाखतीत कनिकानं ती लंडनला कोणाला भेटायला गेली होती याचा खुलासा केला यासोबतच हॉस्पिटलमधील डॉक्टर तिला धमकी देत असल्याचं सुद्धा सांगितलं.
Corona पसरवणाऱ्या कनिका कपूरच्या अटकेची मागणी, होऊ शकते कठोर शिक्षा
कनिका म्हणाली मी 9 मार्चला लंडनवरुन भारतात परतले. माझी मुलं लंडनला शिकत आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटायला तिकडे गेले होते. माझे आई-वडील लखनऊला राहतात. मी जेव्हा परतले त्यावेळी मी पुढचे 14 दिवस कोणालाच भेटू नये अशी गाइडलाइन देण्यात आली नव्हती. मी लंडनवरून परतल्यावर माझ्या आई-वडीलांना भेटायला गेले कारण देशात वातावरण चांगलं नाही आणि माझे आई-वडील एकटे राहतात.
गायिका कनिका कपूर Coronavirus पॉझिटीव्ह, 300 लोकांसोबत केली होती पार्टी
कनिका पुढे म्हणाली, मला खरंच समजत नाही की मी काय चुकीचं वागले. मी फक्त माझ्या घरी परतले आहे. लंडनला माझी 3 मुलं आहेत आणि मी त्यांना भेटायला दर दोन-तीन महिन्यांनी अमेरिकेला जात असते. मी त्या ठिकाणी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले नव्हते. मी माझ्या मुलांना भेटायला गेले होते. मी एक सिंगल मदर आहे.
हॉस्पिटमधील व्यवस्थेबद्दल बोलताना कनिका म्हणाली, मी या ठिकाणी ज्या हॉस्पिटलमध्ये आहे. तिथे माझ्या खाण्या-पिण्याची सुद्धा नीट व्यवस्था नाही आहे. तर ट्रीटमेटची काय सुविधा असणार आहे. मी जेव्हा डॉक्टर्सशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते बरंच वाईट बोलले आणि म्हणाले आम्ही तुमच्या बद्दल इंटरनेटवर वाचलं आहे की तुम्ही खूप चुकीचं काम केलं आहे. मला होम क्वारंटाईनच्या गाइडलाइनबद्दल सांगितलं गेलं नव्हतं ही माझी चूक आहे का.
जान्हवीनं केलं बहीण खुशीच्या चेहऱ्यावर पेंटिंग, VIDEO पाहिल्यावर पोट धरून हसाल