Home /News /entertainment /

जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता सुकेश चंद्रशेखर? 200 कोटीच्या घोटाळ्यातील आरोपीचा दावा

जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता सुकेश चंद्रशेखर? 200 कोटीच्या घोटाळ्यातील आरोपीचा दावा

महाठग सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) ईडीकडून चौकशी झाल्यानंतर अभिनेत्री मोठ्या चर्चेत आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 जानेवारी-  महाठग सुकेश चंद्रशेखरच्या   (Sukesh Chandrashekhar)   मनी लॉन्ड्रिंग   (money laundering) प्रकरणात बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची   (Jacqueline Fernandez)  ईडीकडून चौकशी झाल्यानंतर अभिनेत्री मोठ्या चर्चेत आली आहे. तसेच जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकंच नव्हे तर त्याने अभिनेत्रीला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचं उघड झालं होतं. या सर्व भेटवस्तू पडताळणीसाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यांनतर आता सुकेश चंद्रशेखरचे वकील अनंत मलिक यांनी एक निवेदन जारी केलं आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरच्या वकिलांनी एक निवेदन जारी करत त्यामध्ये लिहिलं आहे, 'सुकेश चंद्रशेखरला ठग, विश्वासघातकी असे काहीही म्हणू नये. कारण त्याच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. तसेच त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे, जॅकलिन फर्नांडिस आणि ते एका नात्यात होते. त्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्याला या अपराधी गोष्टींत आणू नये'. ईडीने जॅकलिनचा लूकआऊट नोटीस रद्द करण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर सुकेशच्या वकिलाने हे निवेदन जारी केलं आहे. जॅकलिनने काही दिवसांपूर्वी हा अर्ज दाखल केला होता. सध्या तिच्यावर परदेशी जाण्याची बंदी आहे. तिला आपल्या काही प्रोफेशनल कमिटमेंटसाठी परदेशात जाणं महत्वाचं होतं. त्यासाठी तिने हा अर्ज केला होता. परंतु ईडीद्वारे ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. भेटवस्तू देण्यासोबतच सुकेशनं जॅकलिनच्या अनेक चित्रपटांची निर्मिती करण्याचं आश्वासनही दिल्याचं म्हटलं जात आहे. सुकेशनं जॅकलीनला सांगितलं होतं की, तो 500 कोटी रुपयांचा तीन भागांचा वुमेन सुपरहिरो चित्रपट तयार करेल ज्यामध्ये जॅकलीन मुख्य भूमिकेत असेल.“हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रित केला जाईल. त्यानं जॅकलीनला सांगितलं होतं की ती हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखीच आहे. ती सुपरहिरो चित्रपटात मुख्य भूमिकेला पात्र आहे. सूत्रानं सांगितलं की, जॅकलीनचं सुकेशशी याबद्दल फारच कमी बोलणं झालं होतं. पण तिला याबद्दल काही अंशी खात्री पटली होती. सुकेशला फिल्म इंडस्ट्रीचं खूप चांगलं ज्ञान होतं. आणि त्याला फिल्मचं बजेट, प्रोडक्शन या सगळ्याची माहिती होती. सुकेशनं जॅकलिनचं मन वळवण्यासाठी इंडस्ट्रीशी संबंधित मोठ्या लोकांची नावेही सांगितली असल्याचं समोर आलं होतं. (हे वाचा:Jacqueline Fernandez Net Worth: जॅकलीन फर्नांडिस आहे एका ... ) सुकेश फेब्रुवारी 2021 मध्ये पहिल्यांदा जॅकलीनशी व्हॉट्सअॅप कॉलवर बोलला होता. त्यावेळी त्याने वर्ण शेखर रतन वेला अशी त्याची ओळख करून दिली होती. सुकेश जॅकलिनच्या संपर्कात फेब्रुवारी 2021 ते 7 ऑगस्ट 2021 या काळात होता. तोपर्यंत त्याला अटक झाली नव्हती. यादरम्यान सुकेशने जॅकलिनला खूप महागडे गिफ्ट तसेत तिच्या कुटुंबाला पैसेही दिल्याचं समोर आलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Jacqueline fernandez

    पुढील बातम्या