जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आदित्य नारायणनं सोडलं Indian Idol; यापुढे ‘हा’ अभिनेता करणार सुत्रसंचालन

आदित्य नारायणनं सोडलं Indian Idol; यापुढे ‘हा’ अभिनेता करणार सुत्रसंचालन

आदित्य नारायणनं सोडलं Indian Idol; यापुढे ‘हा’ अभिनेता करणार सुत्रसंचालन

आदित्यच्या लोकप्रितेचा फायदा ‘इंडियन आयडल’ (Indian Idol) या शोला देखील होत होता. मात्र या शोमध्ये यापुढे आदित्य झळकणार नाही. त्यानं हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 2 एप्रिल: सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) हा गायन क्षेत्रात फारसा प्रभाव टाकू शकला नाही. मात्र सुत्रसंचालनाच्या बाबतीत त्याचा हात कोणीही पकडू शकत नाही. आपल्या अनोख्या शैलीच्या जोरावर त्यानं होस्ट म्हणून स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. अन् त्याच्या याच लोकप्रितेचा फायदा ‘इंडियन आयडल’ (Indian Idol) या शोला देखील होत होता. मात्र या शोमध्ये यापुढे आदित्य झळकणार नाही. त्यानं हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी चाहते काहीसे नाराज आहेत. गेल्या काही काळापासून आदित्य आजारी आहे. शूटिंगच्या ताणामुळं त्याला अशक्तपणा जाणवतोय. शिवाय डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळं आदित्यनं कामातून ब्रेक घेण्यासाठी इंडियन आयडल हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आदित्यच्या जागी अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) होस्टच्या रुपात झळकणार आहे. मात्र त्याची बोलण्याची शैली काहीशी वेगळी आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन आयडलचे चाहते जयला होस्ट म्हणून स्विकारतील का? हे नक्कीच पाहण्याजोगं ठरेल. अवश्य पाहा - ‘सलमान खान एक नंबरचा धोकेबाज’; अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप आदित्य नारायण अलिकडेच लग्नाच्या बेडीत अडकला. त्यानं बालपणीची मैत्रीण श्वेता अग्रवालशी लग्न केलं. कोरोनामुळं अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्याचं लग्न झालं. मात्र त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. इंडियन आयडल सोडल्यामुळं आता तो आपल्या पत्नीसोबत वेळ व्यतीत करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात