जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक भूमिकेसाठी तयारी करतोय', बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता होणार आजोबा

'माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक भूमिकेसाठी तयारी करतोय', बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता होणार आजोबा

'माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक भूमिकेसाठी तयारी करतोय', बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता होणार आजोबा

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजा लवकरच (Sonam Kapoor and Anand Ahuja announce pregnancy) आई-बाबा होणार आहेत. दरम्यान या बातमीनंतर सोनम कपूरचे वडील अभिनेते अनिल कपूर यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च: अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजा लवकरच (Sonam Kapoor and Anand Ahuja announce pregnancy) आई-बाबा होणार आहेत. बी-टाऊनच्या या फॅशनेबल कपलने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने रोमँटिक अंदाजात फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. दरम्यान सोनम कपूरचे वडील अभिनेते अनिल कपूर यांनी देखील लेकीच्या आनंदात एक खास इन्स्टाग्राम (Anil Kapoor Instagram) पोस्ट केली आहे. त्यांनी देखील सोनमचे काही फोटोज शेअर केले आहेत. सोनमने आनंद अहूजासह फोटो शेअर करताना एक साजेसं कॅप्शन देखील दिलं आहे. अभिनेत्रीने हे फोटोज शेअर करताना म्हटलं आहे की, ‘चार हात आहेत, तुझी सर्वोत्तम वाढ करण्यासाठी. दोन हृदयं आहेत, जी तुझ्यासह धडधडतील.. तुझ्या प्रत्येक पावलावर. एक कुटुंब आहे, जे तुझ्यावर प्रेम करेल आणि सहकार्य करेल.’

जाहिरात

सोनमच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. बॉलिवूडमधील तिचे सहकलाकार, मित्र परिवार आणि चाहते या कपलवर कौतुकाचा वर्षाव तर करतच आहेत. पण यावेळी सर्वात खास शुभेच्छा ठरल्या ते होणाऱ्या बाळाचे आजोबा अर्थात अभिनेता अनिल कपूर यांच्या. अभिनेता अनिल कपूर बॉलिवूडमधील ‘चिरतरुण’, ‘हँडसम’ अभिनेता म्हणून ओळखले जातात. मोठ्या पडद्यावर एखादी भूमिका साकारताना त्यांची उत्सुकता नेहमीच पाहायला मिळते. बॉलिवूजच्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती दर्शवतानाही त्यांचा उत्साह दांडगा असतो. त्यामुळेच वयाच्या 65 व्या वर्षीही हा अभिनेता अनेकांचा फेव्हरिट आहे. दरम्यान अनिल कपूर यांनी देखील लाडकी लेक सोनम आणि जावई आनंद अहूजा यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. हे वाचा- समंथा करतेय हॉलिवूडच्या यानिक बेनसह काम,द फॅमिली मॅन-2 नंतर पुन्हा करणार स्टंट्स अनिल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर असं म्हटलं आहे की, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक भूमिकेसाठी तयारी करतो आहे- आजोबा. आमचे आयुष्य आता यापुढे सारखेच असणार नाही आणि मी याहून अधिक कृतज्ञ होऊ शकत नाही. सोनम आणि आनंद या अतुलनीय बातमीने तुम्ही आम्हाला खूप आनंदी केले आहे.’  अनिल कपूर यांनी देखील सोनम आणि आनंद यांचे काही फोटो शेअर केले आहेत.

अनिल कपूर यांच्या पोस्टवर कमेंट करताना अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही युजर्सनी अनिल कपूर यांना Hottest आजोबा असंही म्हटलं आहे. तर काहींनी ‘झक्कास’ अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री सोनम कपूरने 8  मे 2018 रोजी आनंद अहूजाशी लग्न केले. याच दिवशी या दोघांनी जंगी रिसेप्शनही ठेवले होते. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या रिसेप्शमध्ये अनेक दिग्गजांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. सोनम लग्नानंतर आनंदसोबत परदेशात राहते. अधून-मधून ती मुंबईत येते असते. सोनम नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात