जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Samantha करतेय हॉलिवूडच्या Yannick Ben सह काम, The Family Man 2 नंतर पुन्हा करणार भीतीदायक स्टंट्स

Samantha करतेय हॉलिवूडच्या Yannick Ben सह काम, The Family Man 2 नंतर पुन्हा करणार भीतीदायक स्टंट्स

Samantha करतेय हॉलिवूडच्या Yannick Ben सह काम, The Family Man 2 नंतर पुन्हा करणार भीतीदायक स्टंट्स

सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू असून समंथा यासाठी कठोर मेहनत घेत आहे. समंथा या सिनेमात (Samantha New Movie) एका वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. ‘यशोदा’ संदर्भात समोर आलेल्या एका अपडेटनुसार, समंथा द फॅमिली मॅन 2 प्रमाणेच या सिनेमातही स्टंट करताना दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च: समंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu latest news) ही अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या सिनेमातील ‘ऊ अंटवा.. (Oo Antava) मुळे  तिच्या प्रसिद्धीत विशेष वाढ झाली आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) मुळे तिची ओळख केवळ साऊथपुरती मर्यादित राहिली नाही. दक्षिणेतच नव्हे तर संपूर्ण देशात आणि परदेशातही समंथाचे चाहते पाहायला मिळतात. दरम्यान ही अभिनेत्री सध्या तिची अपकमिंग फिल्म ‘यशोदा’ (Yashoda movie 2022) मुळे चर्चेत आहे. यामध्ये ती Unni Mukundan सह दिसणार आहे. ‘यशोदा’मध्ये वरालक्ष्मी सरतकुमार (Varalaxmi Sarathkumar) सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करते आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू असून समंथा यासाठी कठोर मेहनत घेत आहे. समंथा या सिनेमात (Samantha Movie) एका वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. ‘यशोदा’ संदर्भात समोर आलेल्या एका अपडेटनुसार, समंथा द फॅमिली मॅन 2 प्रमाणेच या सिनेमातही स्टंट करताना दिसणार आहे. या सिनेमातील स्टंट अतिशय कठोर असणार असून त्याकरता ती एका प्रसिद्ध विदेशी स्टंट स्पेशलिस्टकडून ट्रेनिंग घेणार आहे. हॉलिवूडच्या स्टंट मास्टरकडून घेणार प्रशिक्षण मेकर्स  ‘यशोदा’ साठी समंथाला पूर्णपणे तयार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. चित्रपटात ती काही कठीण स्टंट करणार आहे आणि याकरता हॉलिवूडचे (Hollywood film industry) स्टंट मास्टर यानिक बेन (Hollywood Stunt Master Yannick Ben) यांना अप्रोच करण्यात आले आहे. समंथाला ट्रेन करण्यासाठी बेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समंथाने मनोज वायपेयी यांच्यासह ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) मध्ये काम केलं आहे, ज्यामध्ये तिने आत्मघाती मोहिमेवर असणाऱ्या श्रीलंकन तमिळ लिबरेशन फायटर राजीची भूमिका साकारली होती. त्यावेळी देखील तिला यानिक बेन यानेच ट्रेनिंग दिलं होतं. त्यांच्या ट्रेनिंगनंतरच समंथाचा धडाकेबाज, भीतीदायक अंदाज पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा ती हॉलिवूडच्या स्टंट मास्टरसह काम करणार आहे.

जाहिरात

थ्रिलर सिनेमासाठी समंथा घेतेय मेहनत ‘यशोदा’ चित्रपटात समंथा (Samantha Yashoda) मुख्य भूमिकेत आहे आणि हा सिनेमा थ्रिलर आहे. तिने फ्रेंच अॅक्शन डायरेक्टर ट्रेनर यानिक बेनसोबत एक फोटोही शेअर केला होता. बेन तिला चित्रपटातील हाय-ऑक्टेन सिक्वेन्ससाठी काही प्रशिक्षण देणार आहे. ‘यशोदा’चे निर्माते तेलुगू व्यतिरिक्त तमिळ, मल्याळम, हिंदी आणि कन्नडमध्ये एकाच वेळी हा सिनेमा प्रदर्शित करणार आहेत. डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या महत्त्वाच्या सीनच्या शूटिंगसाठी 7 स्टार हॉटेलचा भव्य सेट देखील उभारण्यात आला होता. श्रीदेवी मुव्हीजच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे लेखन Duo Hari Shankar यांनी केले आहे आणि तेच या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात