मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वी एका गोंडस लेकाला जन्म दिला आहे. सोनमने 20 ऑगस्ट रोजी ही गुड न्यूज दिली होती. आईबाबा बनल्यानंतर सोनम आणि आनंद अहुजा प्रचंड आनंदी आहेत. ते सतत सोशल मीडियावरुन आपला आनंद व्यक्त करत आहेत. सोनम आणि आनंद यांनी आता त्यांच्या मुलाचं नाव उघड केले आहे. सोनमची बहीण रिया कपूरने बाळाचं टोपण नाव उघड केलं होतं. मावशी रिया सोनमच्या बाळाला सिम्बा म्हणून हाक मारते. मात्र आता बाळाचं नाव समोर आलं आहे. सोनमच्या बाळाला आज एक महिना पूर्ण झालाय. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर सोनमने एक पोस्ट शेअर करत बाळाचं नाव सांगितलं आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी त्यांच्या नवजात मुलाची चाहत्यांना पहिली झलक दाखवली आहे. मंगळवारी म्हणजेच २० सप्टेंबरला सोनम आणि आनंद त्यांच्या चिमुकल्याचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. सोनमचे चाहते अनेक दिवसांपासून सोनमच्या मुलाच्या नावाची वाट पाहत होते. पण आज अखेर त्याच्या एक महिन्याच्या वाढदिवशी, सोनम आणि आनंदने त्यांच्या लहान मुलाचे नाव सांगितले आहे. या दोघांनी मुलाचे नाव ‘वायू’ असे ठेवले आहे.
सोनमने इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या बाळाच्या नावाचा खूपच सुंदर अर्थ सांगितलं आहे. त्यांनी हे नाव का ठेवले याचे स्पष्टीकरण तिने दिले आहे. यांच्या मुलाच्या नावाचा अर्थ सांगताना तिने लिहिले, “आमच्या जीवनात नवीन आनंद आला आहे. हनुमान आणि भीम यांच्या प्रेरणेने, ज्यांनी अपार धैर्य आणि सामर्थ्य प्रकट केले आहे. आम्ही आमच्या मुलासाठी, वायु कपूर आहुजासाठी त्यांचे आशीर्वाद मागतो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये वायु हा पंच तत्वांपैकी एक आहे. तो श्वासोच्छवासाची देवता आहे, हनुमान, भीम आणि माधव यांचे आध्यात्मिक पिता आहे. वाऱ्याचा शक्तिशाली स्वामी वायू.” अशी भावना तिने व्यक्त केली आहे. हेही वाचा - Rana Daggubati : सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर भडकला राणा दग्गुबती; अभिनेत्याच्या त्या कृत्याची होतेय चर्चा सोनम आणि आनंद यांनी 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत केले. त्यांनी त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची घोषणा एका पोस्टसह केली ज्यामध्ये लिहिले होते, “20.08.2022 रोजी, आम्ही आमच्या सुंदर बाळाचे मोकळ्या मनाने स्वागत केले. सर्वांचे आभार डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंब ज्यांनी आम्हाला या प्रवासात साथ दिली. ही फक्त सुरुवात आहे, पण आम्हाला माहित आहे की आमचे आयुष्य कायमचे बदलले आहे. सोनम आणि आनंद.”