जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तारक मेहता’मधील सोज्वळ माधवी भाभीचा हा Bold Look पाहिलात का? फोटोनं इंटरनेटवर घातलेला धुमाकूळ

‘तारक मेहता’मधील सोज्वळ माधवी भाभीचा हा Bold Look पाहिलात का? फोटोनं इंटरनेटवर घातलेला धुमाकूळ

‘तारक मेहता’मधील सोज्वळ माधवी भाभीचा हा Bold Look पाहिलात का? फोटोनं इंटरनेटवर घातलेला धुमाकूळ

माधवी भाभी नेहमी साडीतच वावरते, त्यामुळे प्रेक्षकांनाही त्याची सवय झाली आहे. पण सोनालिकाचा एक हॉट कपड्यांत (Hot Dress) तोंडात बिडी धरून काढलेला फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई 20 सप्टेंबर : मनोरंजनविश्वात काम करणं आणि त्यात आपलं वेगळं स्थान निर्माण करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. देशभरातून लोक मुंबईत दाखल होतात आणि आपलं नशीब बॉलिवूडमध्ये आजमावतात. त्यांना मोठ्या पडद्यावर झळकायचं असतं. काही वेळा त्यांना प्रयत्न करूनही यश मिळत नाही मग ते छोट्या पडद्याकडे म्हणजे टीव्हीकडे आपला मोर्चा वळवतात. तिथं मात्र ते यशस्वी होतात. या छोट्या पडद्यावर भारतात सर्वाधिक काळ सुरू असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मुंबईतील गोकुळधाम या सोसायटीत राहणाऱ्या काही कुटुंबांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर ही मालिका आधारलेली आहे. बिग बॉसच्या घरात ह.भ.प. शिवलीला पाटील यांचं कीर्तन रंगणार! या मालिकेतील मराठी कुटुंबातील माधवी भिडेची भूमिका साकारणारी सोनालिका जोशीही (Sonalika Joshi) खूप लोकप्रिय आहे. ही व्यक्तिरेखा अगदी साध्या सरळ, कुणाच्या अध्यातमध्यात न पडणाऱ्या, नवऱ्याला साथ देणाऱ्या मराठी गृहिणीची आहे. ती सोनालिकाने खूप सुंदर साकारली आहे. माधवी भाभी नेहमी साडीतच वावरते, त्यामुळे प्रेक्षकांनाही त्याची सवय झाली आहे. पण सोनालिकाचा एक हॉट कपड्यांत (Hot Dress) तोंडात बिडी धरून काढलेला फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. त्यावेळी सगळ्याच प्रेक्षकांनी तोंडात बोटं घातली होती. याबाबतचं वृत्त पत्रिका डॉट कॉमनं दिलं आहे. या फोटमध्ये सोनालिकाचे केस बारीक कापलेले होते. गळ्यात रंगबिरंगी गळ्यातलं, कानात निळ्या रंगांचं कानातलं, हातात विविधरंगी बांगड्या यामुळे सोनालिकाचा लूक खूपच हॉट (Sonalika’s Hot Look) दिसत होता. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि माधवी भाभीच्या या अवताराबद्दल प्रचंड चर्चाही झाली होती. सोनालिका सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडिओ टाकत असते. तिला इन्स्टाग्रामवर 4 लाख 36 हजार फॉलोअर्स आहेत. सोनालिकाने 5 एप्रिल 2004 ला समीर जोशी यांच्याशी लग्न केलं. त्यांना आर्या नावाची मुलगी आहे. सासरेबुवा झालेतरी उदित नारायणांची ती सवय सुटेना; सूनेसमोरच… सोनालिका जोशी गेली 13 वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिने इतरही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे पण तारक मेहता का उल्टा चश्माने तिला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. साडी हा पेहराव तिला आवडतो असं तिने अनेकदा सांगितलं आहे. आदर्श गृहिणी म्हणून प्रेक्षक तिच्याकडे पाहतात त्यामुळे तिचे हॉट फोटो पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. एक अभिनेत्री म्हणून तिला अशी फोटो शूट करावी लागतात. अर्थात त्याचा तिच्या कामावर कधीच परिणाम झाला नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात