जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ड्रग्ज ओव्हरडोसनंतर sonali Phogat 2 तास लेडीज टॉयलेटमध्ये; आरोपींच्या जबाबानंतर गोवा पोलिसांनी आखला पुढील प्लान

ड्रग्ज ओव्हरडोसनंतर sonali Phogat 2 तास लेडीज टॉयलेटमध्ये; आरोपींच्या जबाबानंतर गोवा पोलिसांनी आखला पुढील प्लान

ड्रग्ज ओव्हरडोसनंतर sonali Phogat 2 तास लेडीज टॉयलेटमध्ये; आरोपींच्या जबाबानंतर गोवा पोलिसांनी आखला पुढील प्लान

सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी गोवा पोलिसांच्या हालचाली वाढल्या असून आरोपींच्या जबाबानंतर गोवा पोलिसांनी पुढील प्लान आखला आहे. काय असू शकते गोवा पोलिसांच्या तपासाची दिशा? जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑगस्ट: भाजप नेत्या टिक टॉक स्टार सोनाली फोगट यांच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे समोर आले आहेत.  सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी सोनाली यांना जबरदस्ती ड्रग्ज दिल्याची कबुली दिली आहे. तसेच सोनाली यांना 2 तास लेडीज टॉयलेटमध्ये ठेवल्याचाही खुलासा त्यांनी केला.  पोलीस दोघांची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.  सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी गोवा पोलिसांच्या हालचाली वाढल्या असून आरोपींच्या जबाबानंतर गोवा पोलिसांनी पुढील प्लान आखला आहे. सुधीर सांगवान आणि सुखविंदर गोव्याच्या अंजुना पोलिसांनी काल अटक केल्यानंतर त्यांना म्हापसा मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांचा रिमांड घेण्यात येणार आहे. आजचं अंजुना पोलिसांनी दोन्ही आरोपींची मेडिकल टेस्ट केली आहे. सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी सध्या दोन्ही आरोपी, सुधीर सांगवान आणि सुखविंदर,पोलिसांच्या लॉकअपमध्ये आहेत. हेही वाचा - Sonali Phogat Death: सोनाली यांचा गोव्याच्या क्लबमधील ‘तो’ CCTV व्हिडीओ आला समोर; अत्यंत वाईट स्थितीत दिसतेय अभिनेत्री

जाहिरात

सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी दोन्ही आरोपींनी कबुली दिल्यानंतर या प्रकरणातील मोठा दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याचप्रमाणे गोवा पोलिसांच्या हाती लागलेल्या गोव्याच्या क्लबमधील सोनाली यांच्या व्हिडीओनं या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं आहे. यानंतर आता गोवा पोलिसांची तपासाची पुढची दिशा काय असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. गोवा पोलिसांच्या तपासाची दिशा पुढीलप्रमाणे असू शकते. -  आरोपी सुधीर सांगवानकडे अमली पदार्थ कुठून आले ? - त्याने हे औषध सोनालीच्या ड्रिंकमध्ये कसे मिसळले ? - सोनालीच्या नकळत ड्रिंकमध्ये मिसळून सोनालीला ड्रग का देण्यात आलं ? - ड्रग्जच्या ओव्हरडोसनंतर सोनालीला 3 तास लेडीज टॉयलेटमध्ये का ठेवण्यात आलं ? - सुधीरच्या सांगण्यावरून सोनालीला कर्लिस क्लबमधून हॉटेल ग्रँड लिओनी रिसॉर्टमध्ये सोडणारा कॅब ड्रायव्हर कोण होता ? - सोनालीला कर्लिस पबमधून थेट हॉस्पिटलमध्ये का नेले नाही ? - CCTV फुटेजमध्ये डान्स फ्लोअरवर दिसणार्‍या त्या दोन मुली कोण आहेत ? - ज्यांचा गोव्याचे IGP बिश्नोई यांनी पत्रकार परिषदेतही उल्लेख केलाय ? - या दोन मुलींनी गोवा पोलिसांना का कळवले नाही ? - त्या सोनालीला आधी ओळखत होत्या की त्याच दिवशी कर्लीस क्लबमध्ये भेटल्या होत्या ?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात